अनंत अंबानींसोबत सलमान खानचा भन्नाट डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
Anant Ambani's pre-wedding Sangeet : अनंत अंबानी यांच्यापुढे फिका पडला 'टायगर'चा स्वॅग! संगीत सोहळ्या अनंत अंबानी आणि सलमान खान यांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल... संगीत सोहळ्यात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींना लावली हजेरी...
Anant Ambani’s pre-wedding Sangeet : भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबाची चर्चा रंगली आहे. 12 जुलै रोजी मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. अनंत – राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा संपन्न झाला. या संगीत सोहळ्यात आनेकांनी हजेरी लावली. सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात अभिनेता सलमान खान देखील सहभागी झाला होता. एवढंच नाही तर, सलमान खान याने अनंत अंबानी यांच्यासोबत भन्नाट डान्स देखील केला. दोघांच्या डान्सचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये अनंत अंबानी आणि सलमान खान एका गाडीत बसून एकत्र येताना दिसत आहेत. स्टेजवर एन्ट्री केल्यानंतर अनंत अंबानी आणि सलमान खान यांनी ‘ऐसा पहली बार हुआ सतरा अठरा सालो में’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
अनंत – राधिका यांच्या संगीत सोहळ्यात हॉलिवूड सिंगर जस्टिन बिबर याने देखील हजेरी लावली होती. जस्टिन बिबर याने देखील संगीत सोहळ्यात परफॉर्म केलं. ज्यासाठी गायकाने तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न 12 जुलै रोजी मोठ्या थाटात होणार आहे. दुपारी 3 वाजता शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. एवढंच नाही तर, अंबाना कुटुंबियांनी रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं आहे. 14 जुलै रोजी रिसेप्शन होणार आहे. ज्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात येणार आहे.