सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर Shehnaaz Gill आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाज रिलेशनशिपमध्ये होती... सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत आजही शहनाज गिल..., आयुष्याच्या पुढच्या टप्प्याबद्दल अभिनेत्री म्हणाली...

सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर Shehnaaz Gill आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 4:41 PM

मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल सध्या अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात शहनाज महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली होती. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाज रिलेशनशिपमध्ये होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये तुफान रंगल्या. शिवाय चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘बिग बॉस’च्या घरात देखील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती.

अशात, ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान भाईजान याने शहनाजला Move On करण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे सलमान आणि शहनाज तुफान चर्चेत आले होते. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज कित्येक दिवस सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर होती. आजही चाहत्यांच्या मनात दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा असते. अशात विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये शहनाजने आयुष्यात पुढे जाण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचलेल्या शहनाजला कपिलने विचारलं की, ‘तू Move On करण्यासाठी तयार आहेस?’, यावर शहनाज होकार देते. पुढे सलमान खान म्हणतो, ‘म्हण ब्रिंग इट ऑन…’ शहनाज देखील तिच्या अंदाजात म्हणते, ‘ब्रिंग इट ऑन मेन…’ सध्या शहनाज हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by fari (@farimd_94)

सलमान खान पुढे शहनाज हिची बाजू घेत म्हणतो, ‘काही वर्षांपूर्वी सिद्धार्थचं निधन झालं. लोक तरी देखील सिडनाज सिडनाज करत आहेत… सिद्धार्थ आता या जगात नाही.. आणि जिथे कुठे असेल… शहनाजने आयुष्यात पुढे जावं अशीच त्याची इच्छा असणार… तरी देखील लोक सोशल मीडियावर सिडनाज सिडनाज करत असतात…’

पुढे सलमान म्हणाला, ‘आयुष्यभर शहनाज अविवाहित राहिल का? कधीही जगाचं ऐकायचं नाही.. आपल्या मनाचं ऐकायचं… आणि आयुष्यात पुढे जायचं…’ असं सलमान खान शहनाज हिच्यासाठी म्हणाला…

गेल्या काही दिवसांपासून शहनाज आणि राघव जुयाल यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगत आहे. शहनाज आणि राघव याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शहनाज आणि राघव ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. पण शहनाज आणि राघव दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.