Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने दिलं सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. म्हातारपण सलमानच्या चेहऱ्यावर दिसू लागलंय, असं अनेकांनी म्हटलं होतं. त्यावर आता सलमानने उत्तर दिलं आहे.

म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने दिलं सडेतोड उत्तर
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2025 | 8:46 AM

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे जणू समीकरणच बनलं आहे. सेलिब्रिटींना या ट्रोलिंगचा खूप फटका बसतो. त्यांच्या एखाद्या फोटो किंवा व्हिडीओवर नेटकरी नकारात्मक कमेंट्सचा वर्षावच करू लागतात. या ट्रोलिंगवर काही सेलिब्रिटी सडेतोड उत्तर देतात. तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात. मात्र बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा नाही, हे नुकत्याच एका कार्यक्रमात दिसून आलं. त्याच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यासाठी मुंबईत मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ट्रेलर लाँचला सलमानसोबतच त्याचे वडील सलीम खान, सहअभिनेत्री रश्मिका मंदाना, सत्यराज, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस आणि निर्माता साजिया नाडियादवाला उपस्थित होते.

‘सिकंदर’चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर सलमान आणि इतर कलाकार हे विविध प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सज्ज झाले. त्यावेळी त्याच्या एका व्हायरल फोटोचा विषय उपस्थित झाला. सलमानने त्याच्या कुटुंबीयांसाठी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी ‘सिकंदर’च्या स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. तेव्हाचा हा फोटो होता. यावेळी पापाराझींनी सलमानचे जे क्लोज अप फोटो क्लिक केले, त्यात त्याचं वय दिसून येत होतं. यावरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘सलमान म्हातारा झालाय’, ‘सलमानच्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागलंय’ असे कमेंट्स त्यावर होते. अशा ट्रोलर्सना आता सलमानने उत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘सिकंदर’चा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर सूत्रसंचालकाने सलमानला त्याची ऊर्जा आणि स्क्रीनवर दिसलेला टवटवीत चेहरा, यामागचं रहस्य विचारलं. त्यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “अधून मधून कधी-कधी अशी गडबड होत असते. पाच – सात रात्र झोपलो नाही की आणि मग सोशल मीडियावाले हात धुवून मागे लागतात. अशा वेळी त्यांना दाखवावं लागतं की मी अजूनही इथे आहे.”

‘सिकंदर’ या चित्रपटात सलमानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. सलमान आणि रश्मिका यांच्या वयात 31 वर्षांचं अंतर असून चित्रपटात तिने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या अंतराबद्दल प्रश्न विचारला असता सलमान पुढे म्हणाला, “जर हिरोइनला काही समस्या नाही, हिरोइनच्या वडिलांना काही समस्या नाही, उद्या जेव्हा तिचं लग्न होईल, मुलं होतील आणि तेव्हासुद्धा आम्ही एकत्र काम करू. पतीची परवानगी तर मिळेलच ना?” हे ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. सलमानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर येत्या 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.