Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ती भयानक 45 मिनिटं..”; त्या प्रसंगाने उडाला सलमानचा थरकाप, सर्वजण करू लागले प्रार्थना

अभिनेता सलमान खानने पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्ट मुलाखतीत विमानप्रवासातील भयंकर प्रसंग सांगितला. आयफा पुरस्कार सोहळ्यानंतर भारतात परतताना सलमानचा मृत्यूशी सामना झाला होता. विमानातील सर्वजण घाबरले होते.

ती भयानक 45 मिनिटं..; त्या प्रसंगाने उडाला सलमानचा थरकाप, सर्वजण करू लागले प्रार्थना
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 09, 2025 | 12:26 PM

अभिनेता सलमान खानने पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खानने गेल्या वर्षी त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘डंब बिर्याणी’ नावाने पॉडकास्टची सुरुवात केली. त्याच पहिल्यांदाच ‘भाईजान’ पाहुणा म्हणून पोहोचला. या मुलाखतीत सलमानने विमानप्रवासातील एक प्रसंग सांगितला. भाऊ सोहैल खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत परदेशातून येताना मृत्यूच्या दाढेतून परतल्याचा खुलासा सलमानने केला. हे तिघं एका पुरस्कार सोहळ्यासाठी परदेशात गेले होते.

पुरस्कार सोहळ्यातून परत येताना विमानप्रवासादरम्यान पाच-सात मिनिटांसाठी नाही तर तब्बल 45 हून अधिक मिनिटांसाठी टर्ब्युलन्स जाणवल्याचं सलमानने सांगितलं. त्यावेळी सर्व प्रवासी घाबरले होते, मात्र सोहैल खान बिनधास्तपणे झोपी गेला होता.

हे सुद्धा वाचा

“श्रीलंकेत पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यानंतर आम्ही परत येत होतो. प्रवासादरम्यान आम्ही मजामस्करी करत होतो. अचानक आम्हाला विमानात टर्ब्युलन्स (खराब वातावरणामुळे विमानात अस्थिरता जाणवणे) जाणवू लागला. सुरुवातीला आम्हाला ते सर्वसामान्य वाटलं होतं. पण हळूहळू हवेचा आवाज वाढू लागला आणि विमानातील सर्वजण एकदम गप्प झाले. सोहैल आणि मी एकाच विमानात होतो. जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा तो झोपला होता. पुढील 45 मिनिटांपर्यंत टर्ब्युलन्स जाणवत राहिला”, असं सलमानने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by dumb biryani (@dumbbbiryani)

याविषयी तो पुढे म्हणाला, “मी एअरहॉस्टेसकडे पाहिलं, तेव्हा ती प्रार्थना करू लागली होती. तेव्हा मला अजून भीती वाटू लागली होती. पायलटसुद्धा तणावात दिसले होते. एरव्ही त्यांना परिस्थितीची जाणीव असते, त्यामुळे ते निवांत असतात. त्यानंतर ऑक्सिजन मास्क खाली आले आणि मी विचार करू लागलो की, मी आतापर्यंत हे सर्व फक्त चित्रपटांमध्येच पाहिलं होतं. 45 मिनिटांनंतर हळूहळू विमान स्थिर झालं तेव्हा प्रत्येकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. हळूहळू पुन्हा हसणं, मस्करी करणं चालू झालं. सोनाक्षी सिन्हा आणि तिची आईसुद्धा विमानात होती. पण पुन्हा काही वेळाने टर्ब्युलन्स सुरू झाला. पुन्हा दहा मिनिटांपर्यंत टर्ब्युलन्स जाणवू लागलं होतं आणि सर्वजण चिडीचूप झाले होते. विमान सुरक्षित लँड होईपर्यंत कोणीच एका शब्दाने काही बोललं नाही.”

पुतण्याच्या या पॉडकास्टमध्ये सलमान इतरही अनेक मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाला. त्याने अरहान आणि त्याच्या मित्रांना रिलेशनशिप आणि आयुष्याबद्दल मोलाचा सल्लासुद्धा दिला.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.