अंकिताच्या सासूला पाहताच सलमान खानने मारला टोमणा; पाहतच राहिला विकी

'बिग बॉस 17'च्या ग्रँड फिनालेमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने अंकिता लोखंडेची सासू रंजना जैन यांची चांगलीच फिरकी घेतली. यावेळी विकी जैन पाहतच राहिला. पुढच्या सिझनमध्ये तुम्हालाच बोलवायाचा विचार करत आहोत, असं सलमान म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अंकिताच्या सासूला पाहताच सलमान खानने मारला टोमणा; पाहतच राहिला विकी
Salman Khan, Ranjana Jain and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 9:58 PM

मुंबई : 28 जानेवारी 2024 | रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ‘बिग बॉस 17’च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली. कॉमेडियन भारती सिंग आणि कृष्णा अभिषेक यांनी सुरुवातीला बिग बॉसच्या घरात जाऊन स्पर्धकांना पोट धरून हसवलं. त्यानंतर ऑरी म्हणजेच ओरहान अवत्रमणी हा बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आली. घरातील टॉप 5 स्पर्धकांनी त्यांच्या आईंची खास भेट घेतली. यानंतर सूत्रसंचालक सलमान खान याने स्पर्धक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी सलमानने पुन्हा एकदा अभिनेत्री अंकिता लोखंडेची सासू रंजना जैन आणि पती विकी जैन यांना उपरोधिक टोला लगावला.

विकीची आई आणि अंकिताची सासू रंजना जैन या जेव्हा बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा गेल्या, तेव्हापासून त्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. विविध कारणांमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा केलं गेलं. आता पुन्हा एकदा सलमानने आपल्याच अंदाजात त्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. अंकिता आणि बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांसमोर सलमान रंजना यांना म्हणतो, “अंकितापेक्षा संपूर्ण बिलासपूर आणि देशभरात तुम्हीच अधिक प्रसिद्ध झाला आहात. सगळ्या सुना अंकिताच्या बाजूने असतील तर सगळ्या सासू तुमच्या बाजूनेच झाल्या असतील. पुढच्या सिझनमध्ये तुम्हालाच बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून बोलवायचा विचार करतोय.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यानंतर सलमान त्यांनी मुलगा विकीविषयी प्रश्न विचारतो, “विकी आधी अंकिताचा पती म्हणून ओळखला जायचा आणि आता रंजनाचा मुलगा म्हणून ओळखला जाईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” याचं उत्तर देताना रंजना म्हणतात, “दुसरों को खुशबूदार बनाने के लिए खुद को पहले खुशबूदार बनना पडता है” बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या एक आठवड्याआधी विकी घरातून बाहेर पडला. त्यामुळे कुठेतरी तो फिनालेपर्यंत पोहोचला पाहिजे होता, अशी इच्छा तुमच्या मनात आहे का, असा प्रश्न सलमानने त्यांना विचारला. त्यावर रंजना म्हणाल्या, “ट्रॉफी कोणीही जिंकली तरी ती आमच्याच घरी येणार आहे. मुलगा आणो किंवा मुलगी.. दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.”

‘बिग बॉस 17’च्या घरात आणि घराबाहेर सध्या सर्वाधिक चर्चा ही अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडीचीच होत आहे. फॅमिली वीकदरम्यान या दोघांची आई बिग बॉसच्या घरात गेली होती. तिथून बाहेर आल्यानंतर विकीची आई विविध मुलाखतींमध्ये मुलाची बाजू घेताना दिसल्या होत्या. असं करताना त्यांनी अंकिताविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.