Salman Khan : माझ्या वाईट वेळेत, हीच लोकं मला शिव्या घालतील…; असं कोणाला म्हणाला सलमान खान?
Salman Khan : सर्वांच्या वाईट काळात धावून जाणारा सलमान खान म्हणतो, 'जेव्हा माझे वाईट दिवस येतील, तेव्हा हीच लोकं मला शिव्या घालतील, म्हणून...', असं कोणाला म्हणाला भाईजान? सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...
अभिनेता सलमान खान याला आज कोणी ओळखत नाही… असं कोणीही नाही. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गेल्या 36 पेक्षा जास्त वर्षांपासून अभिनेता बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. या वर्षांमध्ये सलमान खान याने असंख्य चांगल्या – वाईट क्षणांचा अनुभव घेतला आहे. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका साकारत सलमान खान याने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण भाईजानला अनेकदा अपयशाचा देखील सामना करावा लागला होता.
अभिनेत्याला अपयश आलं असलं तरी, चाहत्यांच्या संख्येत घट झाली नाही. अशात सलमान असंख्य चाहत्यांना कसं सांभाळतो? असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेलच. एकदा अभिनेता निकितन धीर याने सलमान याला विचारलं होतं. तेव्हा भाईजानने दिलेलं उत्तर ऐकून निकितन देखील थक्क झाला होता.
निकितन म्हणाला होता, ‘मी सलमान खान याला विचारलं होतं, तुला कसं वाटतं डोंगरा खाली राहणारी व्यक्ती देखील तुला ओळखते… यावर सलमान म्हणाला, ‘सर्व काही ठिक आहे. पण जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल ना तेव्हा हीच लोकं मला शिव्या घालतील. त्यामुळे आपल्याला माहिती असायला हवं आपण कोण आहोत…’
पुढे निकितन म्हणाला, ‘दबंग 2 सिनेमाची शुटिंग सुरु होती. शुटिंगसाठी 50 बॉडीगार्डसोबत सलमान खान याच्यासोबत गावात पोहोचलो होते. तेव्हा सलमान याला पाहण्यासाठी जमा झालेल्या चाहत्यांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवणं कठिण झालं होतं. तेव्हा बॉडीगार्ड यांच्यासोबत अनेक अभिनेत्यांनी सलमान याला वाचवलं होतं…’
सांगायचं झालं तर, सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाहीतर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. सलमान खान देखील कधी चाहत्यांना नाराज करत नाही. विशेषतः लहान चाहत्यांना. लहान मुलांसोबत देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. खुद्द अभिनेता देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमान खान चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.