30 वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘करण-अर्जून’ मोठ्या पडद्यावर; सलमान खानच्या पोस्टची चर्चा

सलमान आणि शाहरुख खान यांचा सुपरहिट चित्रपट 'करण अर्जुन' ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. २२ नोव्हेंबरपासून हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या बातमीने चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे.

30 वर्षांनंतर पुन्हा एकदा 'करण-अर्जून' मोठ्या पडद्यावर; सलमान खानच्या पोस्टची चर्चा
Karan Arjun re-release
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 3:50 PM
‘रहना है तेरे दिल में’, ‘तुंबाड’,  हे चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येऊन गेले होते.  म्हणजेच हे चित्रपट नुकतेच री-रिलीज झाले होते. हे चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची इच्छआ प्रेक्षकांची नक्कीच होती.  री-रिलीज होऊनसुद्धा प्रेक्षकांचा मात्र नव्यासारखाच प्रतिसाद पाहायला मिळाला होता. आता प्रेक्षकांची अजून एक इच्छा पूर्ण होणार आहे ती म्हणजे अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खानला एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची. पण या दोन्ही मित्रांचा कोणता नवीन चित्रपट येत नाहीये तर त्यांचा हिट झालेलाच एक चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Karan Arjun re-release

Karan Arjun re-release

शाहरुख खान आणि सलमान खान यांचा गाजलेला चित्रपट ‘करण अर्जुन’ अनेकांना थिएटरमध्ये पाहता आला नाही आता मात्र तो पाहाता येणार आहे. कारण ‘करण अर्जुन’ तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘करण अर्जुन’चे दिग्दर्शक राकेश रोशन यांचा हा  चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. सलमान खाननं त्याच्या चाहत्यांना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘भाईजान’नं या पोस्टमध्ये लिहिलं, ‘राखीजीने चित्रपटात अगदी बरोबर सांगितलं होतं की, माझे करण अर्जुन नक्की येतील… 22 नोव्हेंबरला जगभरातील चित्रपटगृहात.’ ही पोस्ट पाहाताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
90 च्या दशकातील आइकॉनिक चित्रपट
‘करण अर्जुन’ हा चित्रपट 90 च्या दशकातील आइकॉनिक चित्रपट मानला जातो. एवढचं नाही तर या चित्रपटातील डायलॉगही तेवढेच हीट ठरले, त्यातील गाजलेला डायलॉग म्हणजे “मेरे करण अर्जून आयेंगे”. या चित्रपटात तगडे कलाकार तर होतेच शिवाय गाणेही सुपर-डूपर ठरले. आणि त्या गाण्यांची क्रेझ आजही आहे.  हा चित्रपट जुन्या पिढीसह नव्या पिढीलासुद्धा थिएटरमध्ये जाऊन पाहाता येणार आहे. हे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल.
‘करण अर्जुन’च्या कहाणीबद्दल…
‘करण अर्जुन’च्या कहाणीबद्दल सांगायचे झाले तर अतिशय हृदयस्पर्शी, भावनिक आणि त्याकाळातील तो एक अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खाननं अर्जुनची तर सलमान खाननं करणची भूमिका साकारली होती. याशिवाय राखीनं चित्रपटात करण-अर्जुनच्या आईची उत्तम भूमिका साकारली. ‘करण अर्जुन’ चित्रपटात दिवंगत अभिनेता अमरीश पुरीनं ठाकूर दुर्जन सिंग नावाच्या खलनायकाची भूमिका केली होती. चित्रपटातील दोन भावांचा पुनर्जन्म होतो आणि ते त्यांच्या खुनाचा बदला घेतात अशी ती एक रंजक कहाणी आहे.
Karan Arjun re-release

Karan Arjun re-release

‘करण अर्जुन’च्या रि-रिलीजची पोस्ट पाहताच प्रेक्षकांचे कमेंट पाहून  चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळणार असं दिसत आहे.या निमित्ताने तरी सलमान आणि शाहरूख खानला पुन्हा एकदा एकत्रपणे एकाच चित्रपटात आणि तेही मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.