‘बच्चन कुटुंबाला निमंत्रण…’, करिश्मा कपूरच्या लग्नाचा Unseen व्हिडीओ, अनेक सेलिब्रिटी एकाच मंडपात

Karishma Kapoor | करिश्मा कपूरच्या लग्नाचा प्रचंड जुना व्हिडीओ आला समोर, श्रीदेवी यांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष, चाहचे म्हणाले, 'तेव्हा सेलिब्रिटी देखील किती साधे होते...', करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं लग्न फार काळ टिकलं नाही, पण व्हिडीओमध्ये दिसतायेत सर्व आनंदी चेहरे...

'बच्चन कुटुंबाला निमंत्रण...', करिश्मा कपूरच्या लग्नाचा Unseen व्हिडीओ, अनेक सेलिब्रिटी एकाच मंडपात
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 7:38 AM

मुंबई | 1 मार्च 2024 : एककाळ असा होता जेव्हा अभिनेत्री करिश्मा कपूर हिने बॉलिवूडवर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत करिश्माने चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि यशाच्या शिखरावर पोहोचली. करियर यशाच्या शिखरावर असताना करिश्माने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या लग्नासाठी संपूर्ण बॉलिवूड एकाच मंडपात दिसत आहे.

करिश्माने 2003 मध्ये संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. सध्या करिश्मा आणि संजय यांच्या लग्नाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता सलमान खान पासून अभिनेता विवेक ओबेरॉय याच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. तर अनेकांचं लक्ष दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याकडे अनेकांच्या नजरा येऊन थांबल्या. व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर देखील दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. पण करिश्माच्या लग्नाचं निमंत्रण बच्चन कुटुंबाला दिलं नव्हतं. कारण काही कारणांमुळे अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा मोडला होता. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत. ‘पूर्वी सेलिब्रिटी देखील किती साधे असायचे…’ अशी कमेंट देखील चाहते करत आहेत.

करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, करिश्मा हिने 2003 मध्ये लग्न केलं आणि 2005 मध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्रीने 2010 मध्ये मुलाला जन्म दिला. पण मुलांच्या जन्मानंतर देखील संजय आणि करिश्मा यांच्यातील वाद मिटत नव्हते. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

करिश्मा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर संजयने प्रिया सचदेव हिच्यासोबत लग्न केलं. तर करिश्माने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार न करता सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिची चर्चा रंगली आहे.

करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांंमध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.