Arpita Khan | सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी चोरी; पोलिसांनी ‘या’ व्यक्तीला केली अटक
सलिम खान यांना त्या महिलेची मदत करायची होती. काही दिवसांनंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्यासोबत राहणारी लहान मुलगी रस्त्यावर रडत होती. त्यावेळी सलिम यांनी तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ती लहान मुलगी म्हणजेच अर्पिता खान.

मुंबई : अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानने मुंबई पोलिसांकडे चोरीची तक्रार दाखल केली होती. घरातून डायमंडचे महागडे कानातले चोरीला गेल्याची तक्रार तिने पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी अर्पिताच्या घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. संदिप हेगडे असं त्या आरोपीचं नाव आहे. संदिप हा विलेपार्ले पूर्व इथे आंबेवाडीत राहणारा आहे. खारमधील अर्पिताच्या घरात तो गेल्या काही महिन्यांपासून काम करत होता. मेकअप ट्रेमध्ये ठेवलेले पाच लाख रुपयांचे डायमंडचे कानातले चोरीला गेल्याची तक्रार अर्पिताने पोलिसांकडे नोंदवली होती.
वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहन माने यांच्या नेतृत्वाखाली खार पोलिसांनी एक टीम तयार केली. संदिप हेगडे हा गेल्या चार महिन्यांपासून अर्पिताच्या घरी काम करत होता. त्याच्यासोबत असे इतर 11 जण घरकाम करणारे होते. मेकअप ट्रेमधील डायमंडचे कानातले चोरल्यानंतर तो कोणाला काहीच न सांगता तिथून पळाला. अर्पिताचे कानातले पोलिसांना संदिपच्या घरात सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी संदिप हेगडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्पिताच्या घरी ही चोरी 16 मे रोजी झाल्याचं कळतंय. त्याच दिवशी तिने तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.




View this post on Instagram
सलमानच्या घरात अर्पिताची एण्ट्री कशी झाली?
सलमानचे वडील सलिम खान हे एकदा मॉर्निंग वॉकला जाताना त्यांचं लक्ष रस्त्यावरील एका महिलेकडे गेलं. त्या महिलेसोबत एक छोटी मुलगीसुद्धा होती. सलिम खान यांना त्या महिलेची मदत करायची होती. काही दिवसांनंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्यासोबत राहणारी लहान मुलगी रस्त्यावर रडत होती. त्यावेळी सलिम यांनी तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ती लहान मुलगी म्हणजेच अर्पिता खान. अर्पिताने 2014 मध्ये आयुष शर्माशी लग्न केलं. या दोघांना अहिल आणि आयात ही दोन मुलं आहेत.