सलमान खानला दिलासा; पत्रकाराला धमकी प्रकरणी कोर्टात हजर राहण्यापासून सूट

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) अंधेरी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी सलमानला कोर्टात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सलमानला 22 मार्च रोजी समन्स बजावले होते.

सलमान खानला दिलासा; पत्रकाराला धमकी प्रकरणी कोर्टात हजर राहण्यापासून सूट
सलमान खानImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 2:06 PM

Mumbai: अभिनेता सलमान खानला (Salman Khan) अंधेरी कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी सलमानला कोर्टात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सलमानला 22 मार्च रोजी समन्स बजावले होते. 2019 मधील हे प्रकरण आहे. सायकल चालवताना सलमानचा एका पत्रकाराशी वाद झाला होता. सलमानने हा खटला फेटाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी त्यांच्या तक्रारीत सलमान आणि बॉडीगार्ड नवाज शेख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सलमान रस्त्यावर सायकल चालवत असताना काही पत्रकारांनी त्याचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली. तेव्हा त्याने पांडे यांचा मोबाईल हिसकावून घेतला, असा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. सलमानने वाद घालून धमकी दिल्याचा आरोपही पत्रकार पांडे यांनी केला आहे. (Journalists Intimidation Case)

न्यायालयाने यापूर्वी स्थानिक पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. “पोलिसांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि ऑन रेकॉर्ड असलेले इतर पुरावे पाहता आरोपीविरुद्ध कारवाई करण्यासाठी ते पुरेसे कारण आहेत”, असं न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वी दिलेल्या आदेशात स्पष्ट केलं. एखाद्या व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीतील आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास दंडाधिकारी न्यायालय समन्स जारी करते.

तीन वर्षांपूर्वी सलमान खान मुंबईत रस्त्यावर सायकलने फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो सायकल चालवताना पत्रकार अशोक पांडे यांनी त्याचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर आक्षेप घेत सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डने मोबाईल हिसकावून घेतला आणि धमकी दिली, असा आरोप पांडे यांनी केला. याप्रकरणी त्यांनी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा:

Video: Urvashi Rautela झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार! लाइव्ह इव्हेंटमध्ये घडला हा प्रकार

ट्विंकल खन्नाने The Kashmir Filesची उडवली खिल्ली; म्हणाली ‘आता मीसुद्धा..’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.