Salman Khan | सलमान खान याची ‘ही’ अभिनेत्री जगतेय ‘असं’ आयुष्य, एकेकाळी बॉलिवूडवर होतं वर्चस्व
Salman Khan | कशी होती आणि आता काय झालं..., अभिनेता सलमान खान याची 'ही' अभिनेत्री आता काय करते... एकेकाळी सर्वत्र तिचाच होता बोलबाला... कोण आहे 'ती'?
मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | अभिनेता सलमान खान याच्यासोबत आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सलमान खान याने अनेक नव्या अभिनेत्रींसाठी बॉलिवूडचा मार्ग मोकळा केला. पण भाईजान याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या काही अभिनेत्री आज कुठे आहेत, काय करतात कोणाला माहिती नाही. पण सोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. सलमान खान याच्या अशाच अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री भुमिका चावला… एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र भुमिका चावला हिचं वर्चस्व होतं…
‘तेरे नाम’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. भुमिका हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘तेरे नाम’ सिनेमातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. पण अभिनेत्री आता कसं आयुष्य जगत आहे आणि कुठे आहे… याबद्दल जाणून घेवू…
४५ वर्षीय भुमिका चावला हिने नुकताच अभिनेता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं. भुमिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे जवळपास १ मिलियनपेक्षा देखील अधिक फॉलोअर्स आहेत.
भुमिका चावला हिला पाहिल्यानंतर चाहेत कायम तिच्या सौंदर्याबद्दल आणि फिटनेसबद्दल बोलताना दिसतात. वयाच्या ४५ व्या वर्षी अभिनेत्री सौंदर्यासोबतच फिटनेसकडे देखील तितकचं लक्ष देते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
भुमिका चावला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ‘तेरे नाम’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून पून्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली. पण सिनेमात बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करु शकला नाही.
महत्त्वाचं म्हणजे, ‘तेरे नाम’ सिनेमात सलमान खान आणि भुमिका चावला यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता सलमान लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे.