ऐश्वर्यासोबतचं गाणं ऐकून सलमान रडला… फॅन्स म्हणाले, भाई को सच्ची…

भाईजानचं प्रेम खरं होतं, पण... का पूर्ण नाही होऊ शकली सलमान खान - ऐश्वर्या राय यांची लव्हस्टोरी... आजही अभिनेत्रीच्या आठवणींमध्ये रमतो सलमान खान... पुन्हा एकदा सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा... ऐश्वर्याचा विषय निघताच अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी... व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्यासोबतचं गाणं ऐकून सलमान रडला... फॅन्स म्हणाले, भाई को सच्ची...
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 1:55 PM

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याही ओळखीची गजर नाही. भाईजानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेला सलमान, कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमान खान याचं नाव प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं पण, कोणासोबतच भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज कोणत्याच एक्स-गर्लफ्रेंडमुळे अभिनेता चर्चेत नसतो. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याचा अंत फार वाईट होता. पण जेव्हा दोघांच्या नात्याची सुरुवात झाली तेव्हा सर्वत्र फक्त आणि सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा होती. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं होतं. सलमान – ऐशर्याच्या नात्याला दोन वर्ष झाली आणि दोघांच्या नात्यात वाद सुरु झाले.

सलमान खान – ऐश्वर्या राय यांचा सिनेमा

सलमान खान – ऐश्वर्या राय यांनी बॉलिवूडला एक सुपरहीट सिनेमा दिला. सिनेमाचं नाव होतं ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमा आजही तुफान चर्चेत असतो. सिनेमातील ‘तडप-तडप के इस दिल से आह निकलने लगी’ आजही चाहत्यांना आवडतं. एकदा सिंगिग रिऍलिटी शोमध्ये एका स्पर्धकाने हेच गाणं गायलं आणि सलमानच्या डोळ्यातून पाणी आलं. तेव्हाचा व्हिडीओ आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ

का नाही होऊ शकलं सलमान – ऐश्वर्या यांचं लग्न

ऐश्वर्या हिच्या वडिलांनी दोघांच्या नात्याला नकार दिला होता. सलमान त्याच्या जबाबदाऱ्यांमधून पळवाट काढत आहे.. असं ऐश्वर्या हिच्या वडिलांचं म्हणणं होतं. फक्त वडीलच नाहीतर, ऐश्वर्या हिच्या आईने देखील सलमान खान जावई म्हणून पसंत नव्हता. पण वेळेनुसार दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि सलमान – ऐश्वर्या कायमचे विभक्त झाले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न

सलमान खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये कुटुंबियांच्या मदतीने ऐश्वर्या – अभिषेक लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या बच्चन हिला जन्म दिला. ऐश्वर्या तिच्या सुखी संसारात आनंदी आहे तर, सलमान खान कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.