Salman Khan: अनेक वर्षानंतरही ऐश्वर्या रायबद्दल असे विचार ठेवतो सलमान खान, स्वतःच म्हणाला…
Salman Khan Love Life : सलमान खान - ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपला झाली आहेत अनेक वर्ष, तरी देखील एक्स-गर्लफ्रेंडबद्दल असे विचार ठेवतो भईजान; म्हणाला..., चाहत्यांमध्ये कायम रंगत असते सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा...
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती नाही… असं कोणीच नाही. सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता जेव्हा सलमान – ऐश्वर्या यांना एकत्र पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. सलमान – ऐश्वर्या यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. ऐश्वर्या एका मुलीची आई देखील आहे.
ऐश्वर्या हिने अभिषेक याच्यासोबत संसार थाटला. पण सलमान खान मात्र वयाच्या 58 व्या वर्षी देखील अविवाहित आहे. ससलमान – ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहे. पण अनेकदा सलमान खान याला ऐश्वर्या हिच्याबद्दल विचारण्यात येतं. अशात सलमान देखील उत्तर देणं टाळत नाही. एका मुलाखतीत अभिनेत्याला ऐश्वर्या हिच्याबद्दल विचारल आलं होतं.
ऐश्वर्या हिच्यासाठी मी आनंदी आहे… असं म्हणत सलमान खान म्हणाला होता, ‘ऐश्वर्या हिचं आता लग्न झालं आहे. अभिषेक याच्यासोबत तिने लग्न केलं आहे. अभिषेक एक चांगला मुलगा आहे. ऐश्वर्या आता बच्चन… मोठ्या कुटुंबाची सून आहे आणि ती तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे…’
‘तुमची एक्स – गर्लफ्रेंड तिच्या आयुष्यात आनंदी आहे… यापेक्षा आणखी चांगली गोष्ट एका एक्स-बॉयफ्रेंडसाठी काय असू शकते? तुमच्यातील नातं संपलं आहे आणि ती व्यक्ती तुमच्या शिवाय आनंदी नाही असा विचार कधीच करु नका… तुम्हाला कायम तिच्या आनंदाचा विचार करायला हवा…’ असं देखील सलमान खान म्हणाला होता.
ऐश्वर्या राय – सलमान खान
ऐश्वर्या राय – सलमान खान यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं. सलमान – ऐश्वर्या यांनी एकमेकांना जवळपास 6 वर्ष डेट केलं. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट होता. पण आजही सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्या – अभिषेक यांनी 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या बच्चन हिला जन्म दिला. सोशल मीडियावर आराध्या – ऐश्वर्या यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.