‘लग्न होत नाही तोपर्यंत…’, खरंच सलमान खान घेलीये ‘अशी’ शपथ? जाणून व्हाल थक्क
Salman Khan : आजही पत्नीच्या प्रतीक्षेत आहे सलमान खान? भाईजानच्या एका व्हिडीओमुळे सर्वत्र चर्चांना उधाण... नक्की काय आहे प्रकरण? सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सलमान खान याच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा...
मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्याबद्दलची छोटी गोष्ट काही क्षणात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. आता देखील सोशल मीडियावर भाईजान याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगत आहेत. फोटोमध्ये सलमान खान अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत दिसत आहे. पण सलमान खान याच्या फाटलेल्या बुटांकडे चाहत्यांचं लक्ष येऊन थांबलं. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सलमान खान याच्या फाटलेल्या बुटांची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडच्या सर्वत श्रीमंत कलाकारांच्या यादीत सलमान खान अव्वल स्थानी आहे. नुकताच अभिनेता एका सिनेमच्या प्रीमियरसाठी गेला होता. यावेळी सलमान खान याच्या भोवती फोटो काढण्यासाठी पापारांझींची गर्दी जमली. पण चाहत्यांचं लक्ष अभिनेत्याच्या फाटलेल्या बुटांकडे येवून थांबलं..
सलमान खान याचा फोटो पाहिल्यानंतर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. कोणी याला सलमान खान याचा स्वाग म्हणत आहे तर, कोणी ह्यूमन बीइंग म्हणत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सलमान भाईवर सर्व काही सूट करतं…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत नवीन बूट खरेदी करणार नाही… अशी शपथ घेतली आहे सलमान खान याने…’ अशा अनेक केमेंट करत नेटकरी सलमान याला ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, सलमान खान सध्या ‘टायगर 3’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. पण आता सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागला आहे. टायगर सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. आता येत्या दिवसांमध्ये ‘टायगर 3’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिनेत्याने ‘टायगर 3’ सिनेमाचं प्रमोशन देखील फार दमदार केलं आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र फक्त आणि फक्त ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा होती. एवढंच नाही तर, खुद्द सलमान खान आणि कतरिना कैफ देखील सोशल मीडियावर सिनेमाबद्दल नवीन अपडेट शेअर करताना दिसतात. सलमान खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.