ऐश्वर्या राय म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट स्वप्न…’
Aishwarya Rai Love Life | ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यातील 'ती' घटना; अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट स्वप्न...', ऐश्वर्या राय कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते... कोणाला अभिनेत्री म्हणाली आयुष्यातील वाईट स्वप्न... चर्चांना उधाण
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्री सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आज ऐश्वर्या वयाच्या 50 व्या वर्षी कुटुंबासोबत आनंदी आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा ऐश्वर्या तिच्या लव्हलाईफमुळे तुफान चर्चेत राहिली. ‘हम दिल दे चुके समन’ सिनेमात ऐश्वर्या राय अभिनेता सलमान खान याच्यासोबत झळकली. सिनेमाच्या शुटिंग दरम्यानच दोघांमध्ये प्रेम बहरलं होतं. पण नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यामध्ये 8 वर्षांचं अंतर आहे. दोघे जेव्हा एकमेकांना डेट करत होते तेव्हा ऐश्वर्या फक्त 18 वर्षांची तर, सलमान खान 25 वर्षआंचा होता. आता ऐश्वर्या राय ही 50 वर्षांची आहे. तर सलमान खान 58 वर्षांचा आहे. रिपोर्टनुसार, ब्रेकअपनंतर देखील सलमान खान सतत ऐश्वर्या हिच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत होता आणि स्वतःला त्रास देखील करुन घेत होता.
सलमान खान याने ऐश्वर्या हिला शारीरिक आणि मानसिक रित्या त्रास द्यायचा… असे देखील भाईजानवर आरोप आहेत. दरम्यान, 2002 मध्ये ऐश्वर्या राय हिने स्पष्टीकरण दिलं होतं, ‘माझं भलं, माझी समजदारी, माझी प्रतिष्ठा, माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि सन्मानासाठी आता बस्स… मी यापुढे मिस्टर सलमान खान याच्यासोबत काम करणार नाही…’
‘सलमान खानचं चॅप्टर माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट स्वप्न आहे आणि यासाठी मी देवाचे आभार मानेल की सर्वकाही संपलं आहे.’ पुढे ऐश्वर्याने लिहिलं होतं की, ‘सलमान खान याच्या वाईट कृत्यांवर मी कधीच काही बोलली नाही. पण त्याने सतत मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला.’
सलमान खान याच्या वाईट काळात त्याची साथ सोडली नाही. पण कायम त्याच्याकडून गैरवर्तन आणि अपमानाचा सामना करावा लागला…एवढंच नाही तर… ऐश्वर्या म्हणाली होती, त्यांचं नातं दोन वर्षांपूर्वीचं संपलं होतं. पण लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला…
आज ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या – सलमान असतात पण कधी एकमेकांचं तोंड देखील पाहात नाहीत.
सलमान खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये अभिनेत्रीने लेक आराध्या हिला जन्म दिला. ऐश्वर्या कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.