“हा तर बिश्नोईचा एजंट वाटतोय”; सलमानच्या बॉडीगार्डच्या लेकाला पाहून नेटकर्यांची कमेंट
सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा अबीर सिंग याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओतील अबीरच्या लूकमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करत थेट बिश्नोईचा एजंट म्हटलं आहे.

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची कोणती वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही.शेराला आपण नेहमीच सलमान खानसोबत त्याच्या सावलीसारख पाहतो. प्रत्येक क्षणी शेरा नेहमीच सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेतो. आता सलमानला येत असलेल्या धमक्यांमुळे तर शेरा त्याचा सुरक्षेची जरा जास्तच दखल घेताना दिसतो. त्यामुळे शेराची चर्चा ही नेहमी असतेच. पण यावेळी शेराची चर्चा काही वेगळ्याच कारणावरून सुरू आहे. शेराची चर्चा होतेय ती त्याच्या मुलामुळे.. कारण नेटकऱ्यांनी शेराच्या लेकाला बिश्नोईचा एजंट म्हणून चिडवलं आहे.
लूकमुळे बिश्नोईचा एजंट म्हणून चिडवलं
सोशल मीडियावर शेरा आणि त्याच्या मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.शेराच्या मुलाचे नाव अबीर सिंग आहे. खरं तर तो वडील शेरा आणि अभिनेता सलमान खानसोबत दिवाळी पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता.

Salman Khans Bodyguard Sheras Son
दिवाळी पार्टीदरम्यान शेरा आणि त्याचा मुलगा अबीर यांनी फोटोग्राफर्सला पोझही दिल्या. दरम्यान, शेराने नेहमीच प्रमाणे काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती. तर, शेराचा मुलगा अबीरने फ्लोरल कुर्ता परिधान केला होता. मात्र अबीरचा लूक पाहून नेटकऱ्यांन त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.
- Salman Khans Bodyguard Sheras Son
लूकमुळे अबीर ट्रोल
अबीरला त्याच्या एकंदरीत लूकमुळे ट्रोल केले गेले. अबीरने दाढी आणि लांब केस यामुळे तो वडिलांपेक्षाही जास्त वय असल्यासारखा वाटत असल्याच्या कमेंट नेटकऱ्यांकडूनही येत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘शेराचा मुलगा, शेराचे वडील दिसत आहे.’ तर दुसऱ्या एका यूजरने, ‘बाबा मुलापेक्षा हुशार दिसत आहे”, तर एकाने म्हंटल आहे की, “शेराकडे बघून त्याला एवढा मोठा मुलगा आहे असं वाटत नाही”. तर एका युजरने थेट म्हटलं की,”ही तर बिष्णोईचा एजंट वाटतोय” एकंदरीतच लेकाच्या लूकमुळे पहिल्यांदाच शेरा ऐवजी त्याच्या मुलाची चर्चा सुरु आहे.
अबीरबद्दल काही गोष्टी…
अबीरचे टोपणनाव टायगर आहे. तो एक फिटनेस फ्रीक आहे. फिटनेसच्या बाबतीत त्याने वडील शेरा आणि सुपरस्टार सलमान खान यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. अबीरच्या इंस्टाग्राम पोस्टवर त्याच्या वडिलांच्या आणि सलमान खानसोबतच्या पोजने भरलेल्या असतात. अबीर सलमान खानला गॉडफादर मानतो आणि त्याच्या वडिलांनंतर त्याचा ताकदीचा आधारस्तंभ मानतो. इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्याचे 7,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, सलमानने त्याचे तेरे नामचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांना अबीरचे लाँच वाहन निर्देशित करण्याची विनंती केली होती.