बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या जीवाला धोका? पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
Baba Siddique Death: बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या, सलमान खानच्या जीवाला धोका? पोलिसांनी घेतला मोठा निर्णय... बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर बॉलिवूड आणि राजकीय विश्वात सर्वत्र तणावाचं वातावरण
Baba Siddique Death: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. देवीची विसर्जन मिरवणूक जात असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात केलेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर पोलीस आता सतर्क झाले आहेत. पोलीस सलमान खानच्या घराबाहेर कोणालाही थांबू देत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची चांगली मैत्री होती. सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी देखील सलमान दरवर्षी उपस्थित राहायचा. अशात, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची माहिती मिळताच सलमान खान लीलावती रुग्णालयात पोहोचला. रुग्णालयाबाहेरील सलमान खान याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला देखील धोका असल्याचं सांगितलं जात. कारण सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध बिश्नोई गँगशी आहे. गुंड बिश्नोई याने सलमान खान याला देखील अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे सलमान खान याच्या ‘बिग बॉस 18’ शोची शुटिंग देखील थांबवण्यात आली आहे. शिवाय सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत बिश्नोई गँगचा अँगल समोर येत असल्याने पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच सलमानच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यता आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही सलमानच्या घराच्या आसपास येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच सलमानच्या घराकडे येणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. कुणालाही सलमानच्या इमारतीच्या दिशेने फिरकू दिलं जात नाहीये.
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शी समोर आले आहेत. एकाच्या मते बंदुकीचा आवाज ऐकला आणि दुकानातून धावत मी घटनास्थळी आलो. मी घटनास्थळी आलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी झाली होती. बाबा सिद्दीकींना लिलावतीत नेण्यात आल्याचं ऐकलं. त्यानंतर मी परत दुकानात आलो, असं एकाने सांगितलं. तर मी याच परिसरातून कुटुंबासह निघून गेलो होतो. मी गेलो आणि पाच मिनिटानंतर या ठिकाणी गोळीबार झाल्याचं मला समजलं. मला विश्वास बसेना. त्यानंतर मी टीव्हीवर बाबांची हल्ला झाल्याचं पाहिलं, असं दुसऱ्याने सांगितलं.