सलमान खानची वहिनी सोहेलपासून घटस्फोटानंतर आता या व्यक्तीच्या पडली प्रेमात

सलमान खान सध्या त्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. पण सलमान खानचे कुटुंब देखील यामुळे डिस्टर्ब आहेत. त्यांना चिंता सतावते आहे. पण यादरम्यान सोहेल खानच्या एक्स पत्नी सीमा सचदेव देखील चर्चेत आहे. कारण तिने खुलासा केलाय की तो कोणाला तरी डेट करतेय. सोहेल आणि सीमा यांच्या २०२२ मध्ये घटस्फोट झाला होता.

सलमान खानची वहिनी सोहेलपासून घटस्फोटानंतर आता या व्यक्तीच्या पडली प्रेमात
salman khan
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 9:41 PM

सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी ही प्रेमविवाह केला होता. पण अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबासाठी नक्कीच चांगली बातमी नव्हती. कारण अरबाज खान आणि मलायकाचा देखील घटस्फोट झालाय. सीमा ही फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज या शोमध्ये दिसली होती. आता या शोचा तिसरा सीझन आला आहे. ज्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्या एपिसोडमध्ये सीमा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करताना दिसत आहे.

सीमा कोणाला डेट करत आहे?

महीप कपूर सांगतात की सीमा आयुष्यात पुढे गेली आहे. सीमा सांगते की ती आता विक्रम आहुजा नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. एवढेच नाही तर सीमाने विक्रमची तिच्या जवळच्या मित्रांशीही ओळख करून दिली आहे. असेही बोलले जात आहे की, सोहेलला भेटण्यापूर्वी सीमाने विक्रमशी एंगेजमेंट केली होती.

सीमा-सोहेलचं लग्न

सीमा आणि सोहेल खान जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघांनीही पळून जाऊन 1998 मध्ये लग्न केले होते. पण 2022 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण याआधीच ते वेगळे राहत होते. या दोघांची चांगली गोष्ट म्हणजे सीमा आणि सोहेल वेगळे झाले असले तरी ते आपल्या मुलांचे पालकत्व एकत्रच करतात. मुलं कधी सीमासोबत तर कधी सोहेलसोबत राहतात.

विभक्त होण्यावर काय म्हणाली सीमा

शोच्या दुसऱ्या भागात सीमाने तिच्या विभक्त आयुष्याबाबत खुलासा केला होता. एका पॉडकास्टमध्ये सीमाने सांगितले होते की, तिने निर्मात्याला विनंती केली होती की ती शोमध्ये सोहेलपासून वेगळे होण्याबद्दल सांगेल, परंतु यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सत्य प्रत्येकाला कळले पाहिजे.

यावेळी सीमाने असेही सांगितले होते की, घटस्फोटापूर्वी दोघेही ५ वर्षे वेगळे राहत होतो. तो म्हणाला होता, ‘मी त्याला का दोष देऊ? माझा मोठा मुलगा त्यावेळी इतका मोठा होता की त्याला आपण वेगळे व्हावे असे वाटत नव्हते, पण त्यानंतर मला लग्न आणि माझा मुलगा यापैकी एक निवडावा लागला. मग मी मुलगा निवडला.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.