मुंबई : विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारा अभिनेता आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) याने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. विकी कौशल याचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) हे धमाका करताना दिसले. इतकेच नाही तर यांच्या चित्रपटाने मोठा धमाका केला. विकी कौशल आणि सारा अली खान हे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले.
विकी कौशल याच्या चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करताना कतरिना कैफ ही देखील दिसली. सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका केला. विकी कौशल हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आलाय. नुकताच या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ रिलीज करण्यात आलाय.
विकी कौशल हा सॅम बहादूर या चित्रपटात जबरदस्त भूमिकेत दिसतोय. या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ धमाका करताना दिसतोय. सॅम बहादूर हा विकी काैशल याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरतोय. या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ चित्रपटाबद्दल बघायला मिळतंय.
1.26 मिनिटांचा हा टीझर व्हिडीओ असून हा व्हिडीओ मोठा धमाका करताना दिसतोय. सैनिकासाठी त्याचा सन्मान त्याच्या प्राणापेक्षा जास्त मोठा आणि महत्वाचा असतो आणि कशाप्रकारे सैनिक आपल्या वर्दीच्या सन्मानासाठी आपल्या प्राणाची आहुती देखील देऊ शकतो, हे टीझरमध्ये सांगण्यात आलंय. या व्हिडीओमध्ये सॅम बहादूर यांचे दमदार डायलॉग दिसत आहेत.
या टीझरची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. सॅम बहादूर चित्रपटाची स्टोरी 1971 च्या भारत आणि पाकिस्तान युद्धाची आहे. लष्करप्रमुख सॅम यांनी या युद्धात मोठे योगदान दिले. हा चित्रपट त्यांचाच कथेवर आधारित आहे. सॅम बहादूर हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये धमाका करताना दिसणार आहे. यापूर्वीही विकी काैशल हा उरी या चित्रपटात धमाका करताना दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड असे प्रेम देखील दिले.