Samantha | “मला काहीच विसरायचं नाहीये”; नाग चैतन्यबाबत असं का म्हणाली समंथा?

| Updated on: Apr 11, 2023 | 1:10 PM

नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभूने ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट जाहीर केला. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली.

Samantha | मला काहीच विसरायचं नाहीये; नाग चैतन्यबाबत असं का म्हणाली समंथा?
Samantha and Naga Chaitanya
Image Credit source: Instagram
Follow us on

हैदराबाद : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतींमध्ये समंथा तिच्या आजारपणापासून ते खासगी आयुष्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्य यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर समंथाला मायोसिटीस या दुर्मिळ ऑटोइम्युन आजाराने ग्रासलं. परदेशात जाऊन काही महिने उपचार घेतल्यानंतर आता तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आता समंथाने नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केलं आहे.

“ती गोष्ट कधीच विसरू इच्छित नाही”

घटस्फोटानंतर समंथा आणि नाग चैतन्य आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. एकीकडे नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभित धुलिपालाला डेट करत असल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे समंथाने घटस्फोटानंतर एकटंच राहणं पसंत केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबाबत कोणतीच गोष्ट विसरणार नाही, असं म्हटलंय. या मुलाखतीत समंथाला विचारण्यात आलं होतं, की तिच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का, जी ती कधीच विसरू इच्छित नाही?

या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी समंथाने विचारलं की हा प्रश्न तिच्या रिलेशनशिपबाबत आहे का? त्यानंतर ती म्हणाली की या प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे ती अडचणीत येऊ शकते. मात्र तरीसुद्धा समंथा उत्तर देत म्हणते, “मला काहीच विसरायचं नाही. कारण प्रत्येक गोष्टीने मला काहीतरी शिकवलंय. त्यामुळे मला कोणतीच गोष्ट विसरायची नाही.”

हे सुद्धा वाचा

लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट

नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभूने ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट जाहीर केला. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली.

“मी माझ्या लग्नाला 100 टक्के दिले, पण..”

समंथा सध्या तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत समंथा तिच्या घटस्फोटाविषयी व्यक्त झाली. “मला जेव्हा ऊ अंटावाची ऑफर मिळाली, तेव्हा माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. जेव्हा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा प्रत्येक कुटुंबीय आणि शुभचिंतक म्हणत होते की, तू घरी बस, पण कोणत्याही आयटम साँगची ऑफर स्वीकारू नकोस. मला ज्या मित्रमैत्रिणींनी नेहमीच प्रोत्साहन दिलं, त्यांनीसुद्धा मला आयटम साँग करण्यास साफ नकार दिला होता. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते”, असं ती म्हणाली.

याविषयी ती पुढे म्हणाली, “मी का लपून बसावं, असा प्रश्न मला पडला. मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. सर्व ट्रोलिंग, टीका-टिप्पणी आणि द्वेष शांत झाल्यानंतर मी हळूहळू डोकं वर काढावं, जणू मी काही गुन्हाच केला होता, हे सर्व मला पटणारं नव्हतं. त्यामुळे मी माझं काम करत राहणार होते. मी माझ्या लग्नाला 100 टक्के दिले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यासाठी मी स्वत:ला दोषी ठरवू शकत नव्हते. जे मी केलंच नाही त्यासाठी स्वत:च्या मनात अपराधीपणाची भावना आणणार नव्हते.”