Samantha Ruth Prabhu: ‘ते म्हणायचे माझे अनेक अफेअर्स होते, मी अबॉर्शन…’, समंथाचा खळबळजनक खुलासा
Samantha Ruth Prabhu: नागा चैतन्य गर्लफ्रेंडसोबत दुसरा संसार थाटण्याच्या तयारीत... घटस्फोटानंतर पहिली पत्नी समंथा म्हणाली, 'ते म्हणायचे माझे अनेक अफेअर्स होते, मी अबॉर्शन...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समंथा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...
Samantha Ruth Prabhu: साऊथ सिनेविश्वातील प्रसिद्द आणि लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने 2017 मध्ये गोवा याठिकाणी अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत लग्न केलं. हिंदू आमि ख्रिश्चन पद्धतील दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 31 जुलै 2021 मध्ये अभिनेत्रीने स्वतःच्या नावापुढील ‘अक्किनेनी’ नाव हटवलं. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2021 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
नागा याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर समंथा निशाण्यावर आली. सोशल मीडियावर अभिनेत्रीबद्दल अनेक नको त्या चर्चा रंगू लागल्या. दोघांनी देखील कधीच त्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण सांगितलं नाही. दरम्यान अनेक चर्चा देखील रंगली. नागा चैतन्य याच्याकडून मिळणारी 200 कोटी रुपयांचा पोटगी देखील अभिनेत्री नाकारली… शिवाय अभिनेत्रीचे अनेक अफेअर्स होते… अशी देखील चर्चा रंगू लागली होती. यावर खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ट्रोल करणाऱ्या सडेतोड उत्तर दिलं.
सोशल मीडियावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या वैयक्तिक संकटात तुमच्या भावनिक गुंतवणुकीने मला खूप बळ दिलं आहे. तुमच्या सहानुभूती आणि काळजीमुळे मला खोट्या अफवा आणि बातम्यांच्या विरोधात उभे राहण्याचे धैर्य आणि बळ दिलं. त्यासाठी मी आभारी आहे…
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ते म्हणाले माझे अनेक अफेअर्स आहेत, मला मुल नको आहे. मी संधीसाधू आहे आणि मी अनेकदा अबॉर्शन देखील केलं आहे… असं देखील म्हणत आहे. घटस्फोट आयुष्यात घडणारी अत्यंत वाईट घटना आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मला वेळ हवा आहे. माझ्या चारित्र्यावर वैयक्तिक हल्ला करणं अत्यंत चुकीचं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
नागा चैतन्यचा दुसरा साखरपुडा
अभिनेता समंथा रुथ प्रभू हिला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. समंथा सोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा याने 3 वर्षांनंतर अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड शोभिता धुलिपाला हिच्यासोबत साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.