जणू तो तिहेरी विस्फोट होता.. अपयशी लग्न, आरोग्याच्या समस्यांबद्दल समंथा मोकळेपणे व्यक्त

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने गेल्या दोन वर्षांत बऱ्याच समस्यांचा सामना केला. नाग चैतन्यसोबतचा घटस्फोट, मायोसिटीस या आजाराचं निदान.. यांमुळे ती पूर्णपणे खचली होती. आयुष्यातील या पडत्या काळाबद्दल समंथा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

जणू तो तिहेरी विस्फोट होता.. अपयशी लग्न, आरोग्याच्या समस्यांबद्दल समंथा मोकळेपणे व्यक्त
Samantha Ruth PrabhuImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 10:10 AM

मुंबई : 13 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. लग्नाच्या चार वर्षांतच जेव्हा तिचा घटस्फोट झाला, तेव्हा अनेकांनी तिच्यावर टीका करण्यात सुरुवात केली. त्यानंतर समंथाला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराने ग्रासलं. इतकंच काय तर तिच्या चित्रपटांनाही बॉक्स ऑफिसवर यश मिळेनासं झालं. समंथाच्या आयुष्यातील हा पडता काळ होता. त्यानंतर तिने करिअरमधून काही काळासाठी ब्रेक घेतला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथा तिच्या या काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘हार्पर बझार’ला दिलेल्या या मुलाखतीत समंथाने हे स्पष्ट केलं की तिच्या आयुष्यातील हे चढउतार सर्वांसमोर आल्याची तिला फारशी काळजी नाही.

“जेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळाचा सामना केला, मग ते अपयशी ठरलेलं लग्न असो किंवा माझं आरोग्य किंवा माझ्या कामावर झालेला वाईट परिणाम.. माझ्यासाठी हे सर्व एखाद्या तिहेरी विस्फोटासारखं होतं. बूम बूम बूम. गेल्या दोन वर्षांत मी जे काही सहन केलं, त्यापेक्षा आणखी बरंच काही वाईट अनेकांच्या आयुष्यात घडतं”, असं ती म्हणाली. या काळाचा सामना कसा केला, याविषयीही समंथाने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“त्या काळात मी अशा कलाकारांबद्दल वाचलं ज्यांनी आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना केला होता आणि तरीसुद्धा त्यांनी कमबॅक केलं. ट्रोलिंग किंवा नैराश्याचा सामना करूनही ते पुढे निघून आले. त्यांच्या प्रेरणादायी कथांनी मला सकारात्मकता मिळाली. जर त्यांनी केलं, तर मीसुद्धा करू शकते.. अशी प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली. माझ्या आयुष्यातील हा पडता काळ सार्वजनिक झाल्याची मला फारशी काळजी नाही. उलट मला त्या परिस्थितीमुळे खूप ताकद मिळाली. मला माहीत आहे की त्या सर्व गोष्टींचा मी खंबीरपणे सामना करेन. माझ्यासारख्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांमध्येही तेवढीच ताकद आहे, असं मला वाटतं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. 2017 मध्ये या दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं आणि लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले. 2021 मध्ये नाग चैतन्य आणि समंथाने घटस्फोट जाहीर केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.