Samantha Ruth Prabhu: नाग चैतन्यसोबत जिथे राहिली तेच घर समंथाने पुन्हा एकदा घेतलं विकत; घटस्फोटानंतर दोघांनी विकली होती प्रॉपर्टी

घटस्फोटानंतर दोघांनी हैदराबादमधील (Hyderabad) राहतं घर विकलं होतं. मात्र आता समंथाने तेच घर अधिक किंमत मोजून विकत घेतलं आहे.

Samantha Ruth Prabhu:  नाग चैतन्यसोबत जिथे राहिली तेच घर समंथाने पुन्हा एकदा घेतलं विकत; घटस्फोटानंतर दोघांनी विकली होती प्रॉपर्टी
Samantha Ruth Prabhu: नाग चैतन्यसोबत जिथे राहिली तेच घर समंथाने पुन्हा एकदा घेतलं विकतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 1:16 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. समंथा आणि नाग चैतन्यने (Naga Chaitanya) गेल्या वर्षी घटस्फोट जाहीर केला. घटस्फोटानंतर दोघांनी हैदराबादमधील (Hyderabad) राहतं घर विकलं होतं. मात्र आता समंथाने तेच घर अधिक किंमत मोजून विकत घेतलं आहे. यामुळेच समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हैदराबादमधील या घरात समंथा आणि नाग चैतन्य लग्नानंतर एकत्र राहू लागले होते. मात्र घटस्फोटानंतर त्यांनी ते घर विकलं होतं. ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मुरली मोहन यांनी एका मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितलं. समंथाने हे घर पुन्हा विकत घेतलं असून आता ती तिच्या आईसोबत तिथे राहत आहे.

नुकतंच समांथाने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये समंथाने चित्रपटसृष्टीत येण्यामागचं कारण सांगितलं होतं. चित्रपटांमध्ये काम करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे करिअर निवडलं, असं ती म्हणाली. चित्रपटसृष्टीत यश मिळाल्यानंतर समंथाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता ती दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. या एपिसोडमध्ये करण समंथाच्या लग्नाबद्दलही बोलताना दिसतो. त्यावर समंथा त्याला थांबवत म्हणते, “दुःखी विवाहासाठी तू कारणीभूत आहेस.” मात्र समंथा हे कोणत्या संदर्भात बोलते हे एपिसोड पूर्ण पाहिल्यावरच समजू शकेल.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

“जर तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडची बॅचलर पार्टी होस्ट करायची असेल, तर तू कोणत्या दोन बॉलिवूड अभिनेत्यांना डान्स करायला आमंत्रित करशील”, असाही प्रश्न तो समंथाला विचारतो. त्यावर फार विचार न करता समंथा पटकन म्हणते “रणवीर सिंग आणि रणवीर सिंग.” समंथा लवकरच ‘शाकुंतलम’, ‘खुशी’ आणि ‘यशोदा’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. याशिवाय ती ‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या नव्या सिझनमध्ये मनोज वाजपेयीसोबत काम करणार आहे. या वेब सीरिजमधील समंथाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.