आधी नागा चैतन्य बरोबर झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आता 'पुष्पा' चित्रपटातील आयटम साँगमुळे चर्चेत आहे.
'ओ अंतावा ओ ओ अंतावा' या गाण्यावर समंथाने केलेला डान्स प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे.
क्रीती सॅनन, संजीदा शेख या अभिनेत्रीनीही समंथाचे विशेष कैतुक केले आहे.
'पुष्पा' चित्रपटातील या गाण्यासाठी समंथा सहज तयार झाली नाही, तिची प्रचंड मनधरणी करावी लागली, त्यानंतर समंथाने या आयटम साँगसाठी होकार दिला.
पुष्पा चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनने स्वत: समंथाशी यासाठी बोलला व तिला तयार केले.
समंथा या आयटम साँगसाठी राजी नव्हती. स्वत: अल्लू अर्जुनने तिची समजूत काढली तेव्हा तिने होकार दिला.
डान्समधील काही स्टेप्सबद्दल तिची वेगळी मत होती. पण अखेर ती तयार झाली.
समंथा मागच्यावर्षीपासून नागा चैतन्य बरोबर झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे.
दक्षिणेतील ही प्रसिद्ध जोडी मागच्यावर्षी वेगळी झाली. समंथाने फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनमध्ये दमदार अभिनय केला आहे. तामिळ बंडखोर रंगवताना संमथाने तिच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवली.
पुष्पा चित्रपटातील हे गाण फक्त तीन मिनिटांच असून समंथाने त्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये घेतल्याचेही वृत्त आहे. न्यूज 18 ने IWMBUZZ च्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.