Samantha | नाइट क्लबमध्ये समंथाचा वरुण धवनसोबत डान्स; नागार्जुनच्या चाहत्यांनी केलं ट्रोल

समंथाच्या या व्हिडीओवरून नागार्जुनच्या चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. नागार्जुन हे अभिनेता नाग चैतन्यचे वडील आहेत. समंथा आणि नाग चैतन्यने 2021 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही समंथावर बरीच टीका झाली होती.

Samantha | नाइट क्लबमध्ये समंथाचा वरुण धवनसोबत डान्स; नागार्जुनच्या चाहत्यांनी केलं ट्रोल
Samantha Ruth PrabhuImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 3:00 PM

मुंबई : दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा परदेशातील एका नाइट क्लबमध्ये नाचतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत अभिनेता वरुण धवनसुद्धा पहायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी समंथाला ट्रोलसुद्धा केलंय. समंथा सर्बियाच्या एका नाइट क्लबला गेली होती. तिथे ‘ऊ अंटावा’ या तिच्या आयटम साँगवर समंथा थिरकताना दिसली.

या व्हिडीओमध्ये समंथाच्या आजूबाजूला बरीच मुलं दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडमध्ये ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ हे गाणं वाजवलं जातंय. तिच्या आजूबाजूला उपस्थित असलेली मुलं समंथाला डान्स करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. सुरुवातीला ती थोडं लाजते आणि नंतर तीसुद्धा गाण्यावर थिरकते. या व्हिडीओमध्ये समंथासोबत वरुण धवनसुद्धा पहायला मिळतोय. नाइट क्लबमधील समंथाचा हा व्हिडीओ कोणीतरी शूट केला असून सोशल मीडियावर तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमुळे समंथाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

समंथाच्या या व्हिडीओवरून नागार्जुनच्या चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. नागार्जुन हे अभिनेता नाग चैतन्यचे वडील आहेत. समंथा आणि नाग चैतन्यने 2021 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही समंथावर बरीच टीका झाली होती. लग्नाच्या चार वर्षांनंतर नाग चैतन्य आणि समंथाने घटस्फोट जाहीर केला होता. चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली होती.

मुलाच्या घटस्फोटाविषयी नागार्जुन यांनीसुद्धा एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “तो आता खूश आहे आणि सध्या तरी मला हेच दिसतंय. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. त्याच्या आयुष्यातला तो एक अनुभव होता. दुर्दैवी अनुभव. मात्र आपण सारखा तोच विषय घेऊन बसू शकत नाही. तो काळ गेला. तो काळ आता आमच्या आयुष्यात नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातूनही तो काळ निघून जावा अशी माझी इच्छा आहे”, असं ते म्हणाले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.