Samantha: समंथा ‘या’ आजाराने त्रस्त? शूटिंग थांबवून उपचारासाठी परदेशी रवाना

समंथाच्या आरोग्याविषयी महत्त्वाची अपडेट; थांबवलं शूटिंग

Samantha: समंथा 'या' आजाराने त्रस्त? शूटिंग थांबवून उपचारासाठी परदेशी रवाना
Samantha Ruth PrabhuImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 6:15 PM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला (Samantha Ruth Prabhu) आरोग्याच्या विशिष्ट समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं कळतंय. ती उपचारासाठी परदेशी रवाना होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथा सोशल मीडियावर सक्रिय नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिने शूटिंगमधून ब्रेक (Break) घेतल्याचं वृत्त आहे. समंथा काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये झळकली होती. त्यानंतर ती फारशी माध्यमांसमोर किंवा चाहत्यांसमोर आली नाही.

समंथा त्वचेशी संबंधित आजाराने त्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. या आजाराला ‘पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन’ (Polymorphic light eruption) म्हणतात. हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे त्वचेवर होतो. यामुळे समंथा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीये. नुकत्याच पार पडलेल्या अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवरही ती झळकली नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून समंथा ‘खुशी’ या चित्रपटाचं शूटिंग करत होती. मात्र आता तिने शूटिंग थांबवलं आहे. या चित्रपटात समंथासोबत विजय देवरकोंडा दिसणार आहे. या शूटिंगचं वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आलं आहे. आजाराच्या उपचारासाठी ती अमेरिकेला जाणार असल्याचं कळतंय.

Polymorphs Light Eruption हा दुर्मिळ आजार आहे. समंथाच्या आधी सलमान खान आणि दिवंगत अभिनेता इरफान खान देखील या आजाराचे बळी ठरले आहेत. सहसा ज्यांना सूर्यप्रकाशात चालण्याची सवय नसते, त्यांना सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात आल्यावर खाज येते. या खाजमुळे त्वचेवर डाग येऊ लागतात. यात काहींना वेदना देखील होतात.

मॅनेजरने फेटाळलं वृत्त

समंथाच्या आरोग्याविषयी या विविध चर्चा असतानाच आता तिच्या मॅनेजरने हे वृत्त फेटाळलं आहे. हे सर्व फक्त गॉसिप असल्याचं समंथाचा मॅनेजर महेंद्र याने म्हटलंय. मात्र समंथा अमेरिकेला जाणार असल्याचं वृत्त त्याने फेटाळलं नाही. समंथा अमेरिकेला जाणार हे निश्चित असून तिथे ती कशासाठी जात आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.