समंथाच्या ‘यशोदा’ची उत्सुकता शिगेला; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ट्रेलर

'यशोदा'मध्ये सस्पेन्स-थ्रिलरचा तडका; समंथाच्या हिंदी चित्रपटाची उत्सुकता

समंथाच्या 'यशोदा'ची उत्सुकता शिगेला; 'या' दिवशी प्रदर्शित होणार ट्रेलर
SamanthaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 7:28 PM

मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. समंथाच्या आगामी ‘यथोदा’ (Yashoda) या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणाऱ्या या बहुभाषिक चित्रपटाच्या ट्रेलरची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. येत्या 27 ऑक्टोबर रोजी यशोदाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ या ब्लॉकबस्टर गाण्यामुळे समंथाला देशभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. याशिवाय ‘द फॅमिली मॅन 2’ या वेब सीरिजमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयकौशल्याची झलक दाखवली. आता यशोदाच्या माध्यमातून समंथा पुन्हा एकदा तिची प्रतिभा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे.

हे सुद्धा वाचा

समंथाने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळी भूमिका ती यशोदामध्ये साकारणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये समंथासोबतच वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन यांनी सहकलाकारांच्या भूमिका साकारल्या आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समंथाचा समावेश होतो. केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पुष्पा या चित्रपटात तिने पहिल्यांदाच आयटम साँग केला होता. ऊ अंटावा हे गाणं आजही तुफान लोकप्रिय आहे.

समंथाने 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा आणि नाग चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र गेल्याच वर्षी या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.