Samantha: आजारपणानंतर आता कशी आहे समंथाची प्रकृती? मैत्रिणीने दिली महत्त्वपूर्ण माहिती

समंथाच्या प्रकृतीविषयी जवळच्या मैत्रिणीने दिली मोठी अपडेट; अभिनेत्रीला मायोसिटीसचं झालं होतं निदान

Samantha: आजारपणानंतर आता कशी आहे समंथाची प्रकृती? मैत्रिणीने दिली महत्त्वपूर्ण माहिती
समंथा रुथ प्रभूImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 7:40 AM

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. समंथासाठी 2022 हे वर्ष फार काही खास नव्हतं. गेल्या वर्षी समंथाला मायोसिटीस या आजाराचं निदान झालं. या आजारावर ती परदेशात उपचार घेत होती. आता तिच्या जवळच्या एका मैत्रिणीने समंथाच्या प्रकृतिविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथाच्या मैत्रिणीने सांगितलं की आता ती पूर्णपणे ठीक आहे. त्याचप्रमाणे ती कामावर परतण्यास सज्ज झाली आहे. समंथा पूर्णपणे ठीक होईपर्यंत कोणत्याच चित्रपटात काम करणार नसल्याचं म्हटलं जात होतं.

हे सुद्धा वाचा

समंथाच्या मैत्रिणीने पुढे सांगितलं, “जर तुम्हाला तिच्याशी संपर्क साधायचा असेल तर साधू शकता. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की ती कुठे परदेशी गेलेली नाही. माध्यमांमध्ये असं दाखवण्यात आलं की तिने घटस्फोटाबाबत एक मोठी लढाई लढली आहे. मात्र असं काही नाही. समंथाने फक्त एका आजारपणाशी दोन हात केले आहे आणि आता ती पूर्णपणे ठीक आहे.”

कामावर परतल्यावर समंथा आधी अभिनेता विजय देवरकोंडा सोबतच्या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करणार आहे. यानंतर ती पुढील प्रोजेक्टवर काम करणार आहे.

मायोसिटीस म्हणजे काय?

मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.