Samantha Ruth Prabhu | अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेल्या समंथा हिचा नवा लूक व्हायरल; चाहते हैराण

| Updated on: Jul 25, 2023 | 9:43 AM

झगमगत्या विश्वाचा त्याग करत समंथा रुथ प्रभू हिने स्वीकारला अध्यात्माचा मार्ग; अभिनेत्रीचा नवा लूक पाहिल्यानंतर चाहते म्हणाले..., सध्या सर्वत्र समंथा हिच्या नव्या लूकची चर्चा

Samantha Ruth Prabhu | अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेल्या समंथा हिचा नवा लूक व्हायरल; चाहते हैराण
Follow us on

मुंबई | 25 जुलै 2023 : दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समंथा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. झगमगत्या विश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सिटाडेल इंडिया’नंतर समंथा रुपेरी पडद्यावर दिसणार नसल्याची चर्चा रंगत आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी झगमगत्या विश्वाचा त्याग करत समंथा रुथ प्रभू हिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.. प्रकृतीच्या काही कारणांमुळे अभिनेत्रीने अभिनय विश्वातून ब्रेक घेतला आहे. पण अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.

खुद्द समंथा रुथ प्रभू हिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. समंथा हिचा नवा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. २८ एप्रिल १९८७ मध्ये जन्मलेल्या समंथा हिला ‘पुष्पा’ सिनेमातील ‘अंटावा मा’ गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.

हे सुद्धा वाचा

दाक्षिणात्य सिनेविश्व आणि बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीने मोलाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून प्रकृती स्थिर नसल्यामुळे अभिनेत्रीने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. अभिनयातून अभिनेत्रीने ब्रेक घेतला असला तरी, सोशल मीडियावर मात्र अभिनेत्री सक्रिय कायम सक्रिय असते.

 

 

समंथाने नवा हेअरकट केल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमधील अभिनेत्रीच्या हटके अदांवर चाहते देखील फिदा झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त समंथा हिच्या नव्या लूकची चर्चा रंगत आहे. चाहते अभिनेत्रीच्या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत.

अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर समंथा कोयम्बटूरमध्ये मेडिटेशन सेशन करताना देखील दिसली. ज्यामुळे समंथा तुफान चर्चेत आली. समंथा हिने अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत ‘खुशी’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. चाहते देखील विजय आणि समंथा यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

सोशल मीडियावर समंथा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. समंथा हिने अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी, सोशल मीडियावर सक्रिय राहून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या सर्वत्र समंथा हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.