नाग चैतन्यसोबत घटस्फोटानंतर आई होण्याविषयी समंथा स्पष्टच म्हणाली..

लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा आणि नाग चैतन्यने घटस्फोट घेतला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथा आई होण्याविषयी स्पष्टच म्हणाली. या मुलाखतीत समंथाला आई होण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

नाग चैतन्यसोबत घटस्फोटानंतर आई होण्याविषयी समंथा स्पष्टच म्हणाली..
Samantha and Naga Chaitanya Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 9:34 AM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची ‘सिटाडेल: हनी बनी’ ही सीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये समंथा एका आईच्या भूमिकेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथाला मातृत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तिने आई होण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. समंथा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर तिने नाग चैतन्यला घटस्फोट दिला. त्यानंतर तिला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं. मात्र आई होण्यास अद्याप उशीर झाला नसल्याची भावना तिने या मुलाखतीत बोलून दाखवली.

“मला वाटत नाही की या गोष्टीला उशीर झाला आहे. आई होण्याची स्वप्नं माझी अजूनही आहेत. अर्थातच मला आई व्हायला आवडेल. मला नेहमीच आई होण्याची इच्छा होती. तो खूप सुंदर अनुभव असेल. मी याबद्दल नक्कीच विचार करेन. लोक नेहमीच वयाबद्दल काळजी व्यक्त करतात. पण माझ्या मते आई होण्यासाठी असा काही निश्चित वेळ लागत नाही”, असं समंथा म्हणाली.

हे सुद्धा वाचा

आयुष्याबद्दल समंथा पुढे म्हणाली, “माझ्या मते मी माझ्या आयुष्याच्या एका चांगल्या टप्प्यात आहे. मी खरंच खूप खुश आहे आणि प्रत्येक दिवस सर्वार्थाने जगायला मिळणं हे मी माझं सुदैव समजते. कदाचित याआधी मी सर्वसामान्य दिवसाबद्दलही इतकी कृतज्ञ नसते. पण आता मला ती कृतज्ञता जाणवते.” समंथाने 2022 मध्ये तिला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार असल्याचा खुलासा केला होता. मायोसिटीस या ऑटोइम्युन आजारामुळे समंथाने काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. ‘खुशी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला या आजाराचं निदान झालं होतं आणि त्यानंतर तिने उपचारासाठी ब्रेक घेतला होता. उपचारानंतर समंथा आता पुन्हा कामावर परतली आहे.

मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.

समंथा आणि नाग चैतन्य हे लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर हे दोघं आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. नाग चैतन्यने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.