घटस्फोटानंतर आजही स्वतःला सावरु शकली नाही Samantha Ruth Prabhu; म्हणाली…

प्रेम, त्यानंतर लग्नासाठी १० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च, पण नाही टिकलं नातं..., घटस्फोटाच्या १७ महिन्यांनंतर अखेर समंथा रुथ प्रभू हिने 'त्या' नात्यावर सोडलं मौन...

घटस्फोटानंतर आजही स्वतःला सावरु शकली नाही Samantha Ruth Prabhu; म्हणाली...
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 12:42 PM

मुंबई : झगमगत्या विश्वात आधी सेलिब्रिटींची मैत्री होते. मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. त्यांनतर दोघांचं नातं लग्नापर्यंत येवून पोहोचतं. अखेर कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात लग्न देखील पार पडतं. पण लग्नाच्या काही वर्षांनी मात्र नात्याचा शेवट प्रचंड वाईट होतो. असंच काही झालं आहे, अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्यासोबत. जेव्हा नागा चौतन्य आणि समंथा प्रभू यांनी घटस्फोटाची घोषणा केली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचं म्हणजे नागा याच्यासोबत घटस्फोट होवून १७ महिने झाले आहेत. तरी देखील या प्रसंगातून अभिनेत्री अद्याप स्वतःला सावरु शकली नाही.

नागा चैतन्य याच्यापासून विभक्त झाल्यानंतर समंथाने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबद्दल मौन सोडलं आहे. घटस्फोटानंतरचा काळ अभिनेत्रीसाठी फार वाईट होता. अभिनेत्री कायम विचारात रहायची. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने स्वतःला भाग्यवान सांगितलं आहे, कारण कठीण काळात तिच्यासोबत काही खास व्यक्ती होत्या. ज्यांच्या मदतीने अभिनेत्रीने आयुष्यातील कठीण प्रसंगावर देखील मात केली.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘या प्रसंगातून स्वतःला सावरण्याचे प्रचंड प्रयत्न केले. महत्त्वाचं म्हणजे काम करणं सुरु ठेवलं. कारण कठीण काळावर मात करण्यासाठी कामा शिवाय उत्तम पर्याय नाही. वाईट वेळ गेली आहे… हिच गोष्ट मनात ठेवायची होती. कोणत्याही नात्यात जास्त गुंतायचं नाही कळालं… ‘ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

याआधी देखील अनेकदा समंथाने नागा सोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. ‘नातं टिकवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केले. पण योजनेनुसार काहीही झालं नाही…’ असं देखील अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती. जेव्हा दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. (Samantha Ruth Prabhu love story)

सांगायचं झालं तर, नागा चैतन्य आणि समंथा यांची पहिली ओळख २०१० साली ‘माया चेसावे’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी २०१७ मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. नागा चैतन्य आणि समंथा यांनी लग्नासाठी तब्बल १० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. पण दोघांचं नातं फक्त चार वर्ष टिकलं. ऑक्टोबर २०२१ रोजी नागा चैतन्य आणि समंथा यांनी घटस्फोटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.