Samantha | समंथाचं पूर्व पतीसोबत पॅचअप? नाग चैतन्यसोबतच्या ‘या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

अभिनेत्री समंथा आणि नाग चैतन्य यांच्यात पॅचअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्रामवर नाग चैतन्यसोबतचे काही फोटो अनआर्काइव्ह केल्याने या चर्चांना सुरुवात झाली.

Samantha | समंथाचं पूर्व पतीसोबत पॅचअप? नाग चैतन्यसोबतच्या 'या' फोटोंमुळे चर्चांना उधाण
Samantha and Naga ChaitanyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 10:32 AM

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. लग्नाच्या चार वर्षांतच ही लोकप्रिय विभक्त झाली. घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत त्रासदायक होती, असं समंथाने काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. आता जवळपास दोन वर्षांनंतर समंथा आणि नाग चैतन्यच्या ‘पॅच-अप’ची चर्चा होत आहे. या चर्चांना उधाण येण्यामागचं कारण म्हणजे समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनआर्काइव्ह (unarchive) केलेले फोटो. घटस्फोटानंतर समंथाने नाग चैतन्यसोबतचे फोटो डिलिट केल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र ते फोटो तिने डिलिट न करता इन्स्टाग्रामवरच आर्काइव्ह केले होते. आता तेच फोटो तिच्या अकाऊंटवर पुन्हा एकदा दिसू लागले आहेत.

समंथाने नोव्हेंबर 2017 आणि डिसेंबर 2016 मधील नाग चैतन्यचे फोटो अनआर्काइव्ह केले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो काढून टाकायचे असतील तर ते आपण आर्काइव्ह करून ठेवू शकतो. नंतर तेच फोटो अनआर्काइव्ह करून जेव्हा पाहिजे तेव्हा अकाऊंटवर पुन्हा दाखवू शकतो. समंथाने घटस्फोटानंतर नाग चैतन्यसोबतचे सर्व फोटो आर्काइव्ह केले होते. यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘समंथा आणि नाग चैतन्य यांचं पॅच-अप झालंय का’, असा सवाल एकाने केला. तर ‘सोभिता धुलिपालासोबत नाग चैतन्यचं ब्रेकअप झालं का’, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. समंथा तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल, असा अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. ‘ती गोष्टींना स्वीकारू लागली आहे आणि तिच्या आयुष्यात पुढे जातेय’, असं काहींनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाच्याही जोरदार चर्चा आहेत. समंथासोबत घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर तो एका मोठ्या बिझनेसमनच्या मुलीशी लग्न करणार असल्याचं म्हटलं गेलं. मात्र या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसून त्या केवळ अफवा आहेत, असं नाग चैतन्यच्या जवळच्या सूत्रांनी स्पष्ट केलं.

समंथासोबतच्या घटस्फोटानंतर नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं गेलं. या दोघांना अनेकदा एकत्रही पाहिलं गेलं होतं. त्यामुळे सोभिताशी नाग चैतन्य दुसरं लग्न करणार असल्याचीही चर्चा होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.