Samantha | समंथा-विजय देवरकोंडाचा इंटिमेट सीन व्हायरल; रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा

समंथा आणि विजय देवरकोंडा यांचा 'कुशी' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समंथा आणि विजयच्या या रोमँटिक सीनवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Samantha | समंथा-विजय देवरकोंडाचा इंटिमेट सीन व्हायरल; रोमँटिक केमिस्ट्रीची चर्चा
Vijay Deverakonda and SamanthaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 5:21 PM

मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांचा ‘कुशी’ हा चित्रपट शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. समंथा आणि विजयच्या जोडीला मोठा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. तर चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यादरम्यान सोशल मीडियावर ‘कुशी’मधील एक रोमँटिक सीन व्हायरल होत आहे. यामध्ये समंथा आणि विजय इंटिमेट होताना दिसत आहेत. समंथा आणि विजय यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ही नवीन ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

कुशी या चित्रपटातील समंथा आणि विजयचा बेडरूम सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे दोघांमधील केमिस्ट्री चर्चेत आली आहे. कुशी या चित्रपटाच्या आधीही समंथा आणि विजयने एकत्र काम केलं आहे. मात्र पडद्यावर पहिल्यांदाच या दोघांचा रोमान्स पाहायला मिळतोय. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘कुशी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सोशल मीडियावरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांना या दोघांच्या लव्हस्टोरी सोबतच चित्रपटातील गाणीसुद्धा आवडली आहेत. हा चित्रपट जवळपास 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे.

हे सुद्धा वाचा

1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवा निर्वाणाने केलं आहे. यामध्ये समंथा आणि विजयसोबतच सचिन खेडेकर, सरण्या पुनवंदन, मुरली शर्मा, लक्ष्मी, रोहिणी आणि जयराम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एकीकडे या चित्रपटाची दमदार कमाई होत असतानाच दुसरीकडे ‘कुशी’ हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. टोरंट वेबसाईट, तमिल रॉकर्स, टेलिग्राम आणि मूवी रुल्स यांसारख्या साइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कुशी या चित्रपटाच्या शूटिंगनंतर समंथाने कामातून काही काळ ब्रेक घेतला आहे. आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने हा ब्रेक घेतला आहे. समंथाला मायोसिटीस या ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.