‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; पिंपरी-चिंचवडमधील शो पाडला बंद

शो सुरू असताना प्रेक्षकांना काढलं बाहेर; चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप

'हर हर महादेव' चित्रपटाविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; पिंपरी-चिंचवडमधील शो पाडला बंद
'हर हर महादेव' चित्रपटाविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमकImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 4:14 PM

पिंपरी चिंचवड- ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावर छत्रपती संभाजीराजेंनी आक्षेप घेतल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. पुण्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हर हर महादेव’चा चालू शो बंद पाडला. पिंपरी-चिंचवडमधील विशाल टॉकीजमध्ये हा शो सुरू होता. तेव्हाच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थिएटरमध्ये दाखल झाले. थिएटरमधील प्रेक्षकांना बाहेर काढून त्यांनी हा शो बंद पाडला. या सर्व घडामोडींमुळे याठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हर हर महादेव या चित्रपटात शरद केळकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मिलिंद शिंदे यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला आहे. अशा प्रकारचे चित्रपट पुन्हा बनले तर खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.

“ऐतिहासिक सिनेमे निघतायेत ते कौतुकास्पद आहे. पण चित्रपटाच्या स्वातंत्र्यानुसार इतिहासातील घडामोडींची मोडतोड केली जातेय. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला चालणार नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची प्रचंड मोडतोड करण्यात आली आहे”, असा आरोप संभाजीराजेंनी केला होता.

हे सुद्धा वाचा

संभाजी ब्रिगेडच्या वतीने हर हर महादेव या चित्रपटाच्या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतिश काळे, सचिव संजय जाधव, उपाध्यक्ष जिल्हा संघटक गणेश कुंजीर, कार्याध्यक्ष प्रशांत कुंजीर, संजय जाधव, मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे, सहसचिव भैय्यासाहेब गजधने, जिजाऊ ब्रिगेडच्या शोभा जगताप, स्मिता म्हसकर, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील कार्याध्यक्ष गणेश सरकटे, रविंद्र चव्हाण, मराठा क्रांती मोर्चाचे जिवन बोराटे, सागर तापकीर, अभिषेक म्हसे, योगेश साळवी, महेश कांबळे, हिरा जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाली. हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांना त्यांनी तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. “हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये दाखवणं थांबवा. चित्रपटगृहात पडदे फाडल्याशिवाय थिएटर मालकांना अक्कल येणार नाही”, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला.

पिंपरी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. परवानगीशिवाय आंदोलन केल्याने पोलिसांनी 10 ते 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.