‘बलात्कार होत असेल तेव्हा पण…’, प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला पूनम पांडे हिच्यावर निशाणा

poonam pandey : स्वतःच्याच मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यामुळे पूनम पांडे वादाच्या भोवऱ्यात... प्रसिद्ध अभिनेत्री निशाणा साधत म्हणाली, 'बलात्कार होत असेल तेव्हा देखील...', पूनम पांडे हिला होतोय सर्वच स्तरातून विरोध...

'बलात्कार होत असेल तेव्हा पण...', प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला पूनम पांडे हिच्यावर निशाणा
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 12:31 PM

मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या निधनाच्या चर्चांमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्रीचं निधन सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण सोशल मीडियावर पोस्ट करत खुद्द पूनम हिने जिवंत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. आता प्रत्येक जण पूनम पांडे हिचा विरोध करत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने देखील पूनम पांडे हिच्यावर निशाणा साधाल आहे. कॅन्सरमुळे मृत्यूचं नाटक केलं, बलात्कार झाल्यानंतर काय करशील? असा प्रश्न अभिनेत्री संभावना सेठ हिने उपस्थित केला आहे.

संभावना म्हणाली, ‘आम्हाला कळलं काल ज्या व्यक्तीचं निधन झालं होतं, ती व्यक्ती आज जिवंत झाली… हा तर फक्त कॅन्सर अवेयरनेससाठी एक कार्यक्रम होता. ही फक्त एक पीआर ऍक्टिव्हिटी आहे… मी एवढंच म्हणेल. तुझ्या पीआरने तुला समजावलं नाही का, तुला असं करायला नको म्हणून…’

‘काल सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये खळबळ माजली होती. याठिकाणी मी सर्वांच्या वतीने बोलत आहे. तू सांगत आहेस, तू फक्त अवेयरनेससाठी हे सगळं केलं. पण किती लोकांच्या मानसिक भावनांसोबत तू खेळली आहेस… माहिती आहे तुला, सर्वत्र फक्त 32 वर्षांची बिचारी मुलगी गेली… अशा चर्चा होती.’

हे सुद्धा वाचा

पुढे संभावना म्हणाली, ‘सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त पूनम पांडे हिचं निधन… अशी चर्चा होती. किती लाजीरवणं कृत्य केलं आहेस तुला माहिती आहे. खरंच काही झालं तर, तुला कोण कुत्रा विचारणार नाही. उद्या बलात्कारावर अवेयरनेस होत असेल तर, काय करशील?’ असा प्रश्न देखील संभावना सेठ हिने उपस्थिती केला.

सांगायचं झालं तर, पूनम पांडे जिवंत आहे. तिने खुद्द सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. “मला माफ करा ही मी हे इतकं टोकाचं पाऊल उचललं. पण त्यामुळे अचानक सर्वजण सर्वाइकल कॅन्सरबद्दल चर्चा करू लागले आहेत. त्यामुळे खोटं बोलण्यामागे माझा जो उद्देश होता, तो पूर्ण झाला आहे”, असंही पूनम हिने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणलं आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.