लग्नाआधीच होणाऱ्या पतीसोबत सासरी ‘नाईट स्टे’ केल्याने भडकली सासू? समीरा रेड्डीचा खुलासा

जवळपास 20 वर्षांपूर्वी ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री समीरा रेड्डी ही सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी अनेकदा सोशल मीडियावर ती विविध कारणांमुळे चर्चेत असते.

लग्नाआधीच होणाऱ्या पतीसोबत सासरी 'नाईट स्टे' केल्याने भडकली सासू? समीरा रेड्डीचा खुलासा
अभिनेत्री समीरा रेड्डी आणि तिची सासूImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 12:49 PM

अभिनेत्री समीरा रेड्डीने फिल्म इंडस्ट्रीतील करिअर फार काळ टिकलं नाही. पण सध्या ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. समीरा तिच्या सासूसोबतचे मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. त्यांना ती गमतीने ‘सॅसी सासू’ असंही म्हणते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीरा तिच्या सासूविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे लग्नाआधी बॉयफ्रेंडच्या घरी राहण्याबद्दल त्यांचं काय मत होतं, याविषयीही तिने खुलासा केला. समीराने 21 जानेवारी 2014 रोजी उद्योजक अक्षय वर्देशी लग्न केलं. या दोघांचं लग्न महाराष्ट्रीय विवाहपद्धतीनुसार पार पडलं होतं. या दोघांना हन्स हा मुलगा आणि नायरा ही मुलगी आहे. लग्नानंतर समीराने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं. त्याआधी तिने ‘नो एण्ट्री’, ‘रेस’ आणि ‘दे दना दन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत समीरा म्हणाली, “सुरुवातीपासूनच आमचं नातं विचित्र पण तितकंच सोपं होतं. लग्नाआधी मी त्याच्या घरी राहिले तरी त्यांना कोणतीच समस्या नव्हती. त्यावेळी मी 32 आणि अक्षय 30 वर्षांचा होता. त्या म्हणायच्या, तुम्ही तुमच्या तिशीत आहात, मी काही मूर्ख नाही. त्यातही सर्वांत रंजक बाब म्हणजे त्या खूप पारंपरिक आहेत. तरीसुद्धा त्या खुल्या विचारांच्या आहेत. हे समीकरण मलाही जरा संभ्रमात पाडणारं होतं. पण त्यात कुठेच दिखावा नव्हता.”

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत समीराने तिच्या डेटिंगच्या आठवणीही सांगितल्या. ती पुढे म्हणाली, “अक्षय आमच्या डेटवर त्याच्या आईलाही घेऊन यायचा. माझ्यासाठी हे नवीनच होतं. माझी आई एकटीच आहे, ती घटस्फोटीत आहे, त्यामुळे वीकेंडला मी तिला माझ्यासोबत घेऊन येतो.. असं तो म्हणायचा. त्यामुळे आमच्या डेटिंगच्या पहिल्या सहा महिन्यात त्याची आई आमच्यासोबतच यायची. मला तेव्हा प्रश्न पडायचा की आम्ही नेमकं काय करतोय?”

अक्षयच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दलचे किस्सेही त्याची आई समीराला सांगायची. मात्र ते सांगताना त्यांना समीराच आवडत असल्याचं त्या स्पष्ट करायच्या. “आमच्या नात्यातील हाच अत्यंत विनोदी भाग आहे. आमचं नातं हे सुरुवातीपासूनच असं थोडंसं विचित्र होतं. पण त्यामुळेच आमचं नातं सोप्या पद्धतीने विणलं गेलं”, अशा शब्दांत समीरा व्यक्त झाली.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.