सना खानने 7 वर्षांनी लहान मौलानाशी लग्न का केलं? अखेर केला खुलासा

इस्लाम धर्माचं कारण देत अभिनेत्री सना खानने ग्लॅमर विश्वाला रामराम केला होता. त्यानंतर अचानक मौलाना मुफ्ती अनस सय्यदशी लग्न करून तिने सर्वांनाच मोठा धक्का दिला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सना तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

सना खानने 7 वर्षांनी लहान मौलानाशी लग्न का केलं? अखेर केला खुलासा
Sana Khan with husbandImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 3:41 PM

विविध चित्रपट आणि ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्ये झळकलेली प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री सना खानने 2020 मध्ये ग्लॅमर विश्व सोडलं होतं. त्यानंतर तिने अचानक मौलाना मुफ्ती अनस सय्यदशी निकाह केला. तिच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. इस्लाम धर्माचं कारण देत सना खानने इंडस्ट्री सोडली होती. तेव्हापासून ती बुरख्यातच दिसून येते. सनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील सर्व ग्लॅमरस फोटोसुद्धा डिलिट केले होते. सना आता तिच्या सोशल मीडियावरून फॉलोअर्सना इस्लाम धर्माची शिकवण देते. नुकतीच ती अभिनेत्री रुबिना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये झळकली होती. या मुलाखतीत तिने तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान असलेल्या मुफ्तीसोबत लग्न करण्यामागचं कारण सांगितलं.

रुबिनाच्या या पॉडकास्टमध्ये सनाने पहिल्यांदाच तिच्या आणि तिच्या पतीच्या वयातील अंतराबद्दल सांगितलं. लग्नाविषयी ती म्हणाली, “एका मौलानाजींनी मला अनसचं स्थळ पाठवलं होतं. मी विचार केला की हे कसं शक्य होईल? कारण अनस माझ्यापेक्षा वयाने सात वर्षांनी लहान आहे. मी अनसलाही हाच प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने अत्यंत प्रेमाने मला समजावलं की हे लग्न का केलं पाहिजे? अनसला भेटण्याआधी मला असं वाटायचं की मौलाना खूपच बोरिंग असतात. कारण त्यावेळी मी अत्यंत आलिशान आयुष्य जगत होती. पण जेव्हा अनस त्याच्या एका दिवंगत मित्राबद्दल अत्यंत भावूक होऊन माझ्याशी बोलत होता आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी दुआ मागत होता, तेव्हा माझे सर्व विचार बदलले. मी स्वत:लाच असा प्रश्न विचारला की या इंडस्ट्रीत माझा असा कोणी मित्र किंवा मैत्रीण आहे का, जी किंवा जो माझ्या निधनानंतर अशाप्रकारे विचार करू शकेल, माझ्याबद्दल प्रेमाने बोलू शकेल. तेव्हा मला जाणवलं की इथे माझं असं कोणीच नाही. अनसच्या माणुसकीमुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाले.”

हे सुद्धा वाचा

अनसशी निकाह केल्यानंतर सनाला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. लग्न आणि पतीबाबत झालेल्या या ट्रोलिंगबद्दलही सना या पॉडकास्टमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. तिने सांगितलं की कशापद्धतीने लोक पैज लावत होते की तिचं नातं फार काळ टिकणार नाही. इतकंच नाही तर काही लोकांनी अशी भविष्यवाणीही केली होती की तिचं लग्न तीन महिन्यांपेक्षा अधिक टिकणार नाही किंवा सहा महिन्यातच ती घटस्फोट घेईल. “अनस आणि माझं कधी बाळसुद्धा होणार नाही, असं या लोकांना वाटत होतं. लोक माझ्याबद्दल खूप वाईट पद्धतीने बोलून व्हिडीओ पोस्ट करायचे. मी खूप भावनिक आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या ट्रोलिंगचा सामना करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. मला स्वत:ला सावरण्यासाठी फार वेळ लागला. लग्नानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत मी अशा पद्धतीच्या नकारात्मकतेमुळे रडत बसायची. यातून बाहेर पडण्यात अनसने माझी खूप मदत केली.”

... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी.
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात..पवारांचा कोणावर निशाणा?.
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली
धारावीतील तणावाला जबाबदार कोण? आरोप करत सोमय्यांनी थेट नावंच सांगितली.
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले
'शरद पवारांनी कधी तरी हिंदूंचीही बाजू..', नितेश राणे नेमकं काय म्हणाले.
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
'जिहादी-तिरंग्याचा काय संबंध...', जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा.
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी.
'एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील...', कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
'एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील...', कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?.