अभिनेत्रीचे आजोबा 80 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात, बायको फक्त 21 वर्षांची, राजकारणी कुटुंबाशी कनेक्शन
Actress Life: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आजोबांनी वयाच्या 80 व्या वर्षी 21 वर्षीय तरुणीसोबत उरकलं लग्न, आता भारतात नाही मिळत काम, अभिनेत्रीचं राजकारणी कुटुंबाशी कनेक्शन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा...

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या एका सिनेमातूनच प्रसिद्धी झोतात आल्या. पण त्यांची लोकप्रियता फार काळ टिकली नाही. पण अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्य आणि कुटुंबामुळे चर्चेत राहिल्या. अशीच एक अभिनेत्री आहे, जिच्या 80 वर्षांच्या आजोबांनी फक्त 21 वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सध्या ज्या अभिनेत्रीच्या आजोबांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘सनम तेरी कसम’ फेम अभिनेत्री मारवा होकेन आहे. मारवा होकेन ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
‘सनम तेरी कसम’ सिनेमातील मारवा होकेन हिने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने याच वर्षी अमीर गिलानी यांच्यासोबत लग्न केलं आहे. मारवा हिचे पती अमीर गिलानी हे पाकिस्तानचे ज्येष्ठ वकील आणि मंत्री सय्यद इफ्तिकार हुसैन गिलानी यांचे नातू आहेत.
इफ्तिकार हुसैन गिलानी यांनी वयाच्या 80 व्या 21 वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं आहे. इफ्तिकार हुसैन यांनी 2021 मध्ये लग्न केलं. 21 वर्षीय तरुणीसोबत लग्न केल्यामुळे इफ्तिकार हुसैन तुफान चर्चेत आले. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. फोटो व्हायरल झाल्यानंतर इफ्तिकार हुसैन यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
Ex Minister Syed Iftikhar Hussain Gilani married at age 80.#zaher milega sahb? pic.twitter.com/fpvvIIhZzQ
— Ali Waقas (@Oye___Ali) January 31, 2021
मारवा होकेन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2013 मध्ये टीव्ही विश्वात पदार्पण केलं आणि करीयरला सुरुवात केली. छोट्या – मोठ्या भूमिका साकारत मारवा हिने अभिनय विश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं. अखेर 2016 मध्ये अभिनेत्रीला ‘सनम तेरी कसम’ सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मारवाने देखील मिळालेल्या संधीचं सोनं केलं. सिनेमातील अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फेल ठरला.
यानंतर मारवाने आणखी काही बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम केलं. मात्र काही काळानंतर भारताने दहशतवादामुळे पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली. यानंतर मारवालाही भारतात काम मिळत नाहीये. पाकिस्तानी कलाकारांनी आजही सिनेमात काम करण्याची संधी मिळत नाही.
मारवा होकेन आता मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. मारवा होकाने हिचे पती अमीर गिलानी हे पाकिस्तानातील राजकीय कुटुंबातील आहेत. अमीर गिलानी यांचे आजोबा सय्यद इफ्तिखार हुसैन गिलानी हे देखील एक ज्येष्ठ वकील आणि पाकिस्तानचे माजी कायदा मंत्री होते.