‘जेव्हा तो बलात्काराचा प्रयत्न करतो…’, आमिर खान याच्या दुसऱ्या पत्नीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाने साधला निशाणा

Aamir Khan Ex wife : 'जेव्हा तो बलात्काराचा प्रयत्न करतो...', झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि आमिर खान याची किरण राव यांच्यातील वाद चव्हाट्यावर..., दिग्दर्शकाने नाव न घेता साधला किरण हिच्यावर निशाणा...

'जेव्हा तो बलात्काराचा प्रयत्न करतो...', आमिर खान याच्या दुसऱ्या पत्नीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाने साधला निशाणा
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 9:57 AM

मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता नाही तर, आमिर याची दुसरी पत्नी किरण राव तुफान चर्चेत आली आहे. ‘कबीर सिंग’ आणि ‘ॲनिमल’ सिनेमाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी नाव न घेता किरण राव हिच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी किरण राव हिने ‘कबीर सिंह’ आणि एसएस राजामौली याच्या ‘बाहुबली’ सिनेमाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘कबीर सिंह’, ‘बाहुबली’ यांसारखे सिनेमे स्टॉकिंगला दुजोरा देतात… असं किरण म्हणाली होती..

नुकताच झालेल्या मुलाखतीत, संदीप रेड्डी यांनी आमिर खान स्टारर ‘दिल’ सानेमाचा दाखला देत किरण राव हिच्यावर निशाणा साधला आहे. सिनेमात आमिर याच्या भूमिकेने अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने साकारलेल्या भूमिकेवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती.

किरण हिच्या वक्तव्यावर संदीप रेड्डी म्हणाले, ‘काही लोकांना कळत नाही, की ते काय करत आहेत. मझ्या सहाय्यक दिग्दर्शकाने मला एका लेख दाखवला होता, ज्यामध्ये ‘बाहुबली’ आणि ‘कबीर सिंग’ यांसरखे सिनेमे महिला विरोधाला प्रमोट करत आहेत.. असं लिहिलं होतं. मला असं वाटतं स्टॉकिंग आणि अप्रोचिंग यांमध्ये प्रचंड अंदर आहे. ‘

पुढे संदीप याने 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल’ सिनेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘मला सांगायचं आहे की, जा आणि आमिर खान याला विचारा ‘खंबे जैसी खडी है’ गाण्याबद्दल विचारा ते काय होतं? त्यानंतर माझ्याकडे या… ‘दिल’ सिनेमाबद्दल तुमच्या काही लक्षात असेल तर, जेव्हा तो बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो… ते सर्व काय होतं? मला कळत लोकं त्यांच्या भोवती काय सुरु आहे, त्याकडे लक्ष न देता थेट निशाणा साधतात…’ सध्या सर्वत्र संदीप रेड्डी आणि किरण राव यांच्या वादाची चर्चा रंगली आहे.

अभिनेता आमिर खान स्टारर ‘दिल’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता माधुरी हिच्या भूमिकेवर बळजबरी करताना दिसतो, तिला धमकी देताना दिसतो… पण अखेर आमिर, माधुरी हिला सोडून देतो. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला, पण काही सीनमुळे चर्चांना उधाण आलं होतं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.