पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या बायकांना देतात वाईट वागणूक? सानिया मिर्झाने कडून पर्दाफाश

| Updated on: Jan 23, 2024 | 1:59 PM

sania mirza marriage : पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या बायकांसोबत कसे वागतात? सनिया मिर्झा हिच्याकडून मोठं सत्य समोर... पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब याने तिसरं लग्न केल्यानंतर सानिया हिच्या खासगी आयुष्याच्या रंगत आहेत चर्चा...

पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या बायकांना देतात वाईट वागणूक?  सानिया मिर्झाने कडून पर्दाफाश
Follow us on

sania mirza marriage : भारताची माजी टेनिसपटू आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक याची पत्नी सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्याबद्दल गेल्या काही दिवासांपासून तुफान चर्चा रंगली आहे. शोएब मलिक याने सानिया हिच्यासोबत असलेले सर्व संबंध मोडत पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. शोएब याने तिसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त आणि फक्त शोएब आणि सानिया यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत.

शोएब याने तिसरं लग्न केल्यानंतर सानिया तिच्या पाच वर्षांच्या मुलासोबत दुबईत राहात आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर सानिया आणि शोएब यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, सानिया आणि शोएब यांनी एका मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या…

मुलाखतीत, पाकिस्तानी क्रिकेटर्स त्यांच्या बायकांसोबत कसे वागतात यावर सानिया हिने मोठं वक्तव्य केलं होतं. एका जुन्या मुलाखतीत शोएब म्हणत होता, ‘आमच्या येथे जन्म झाल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक जण प्रेम करतो.. त्यानंतर दमदाटी करायला सुरुवात होते….’ दरम्यान, बोलत असलेल्या शोएब याला थांबवून सानिया पाकिस्तानी क्रिकेटपटूंबद्दल मोठं वक्तव्य करते…

हे सुद्धा वाचा

सानिया म्हणते, ‘पाकिस्तानी क्रिकेटर्स फक्त त्यांच्या बायकांची खिल्ली उडवतात. या शोमध्ये मला एक मोठं सत्य सांगायचं आहे… पाकिस्तानी क्रिकेटपटूंची सर्वांत मोठी आवड म्हणजे स्वतःच्या पत्नीची खिल्ली उडवणे आहे…’ सध्या सर्वत्र सानिया मिर्झा हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

शोएब मलिक होतोय ट्रोल…

शोएब मलिक याने तिसरं लग्न केल्यामुळे माजी क्रिकेटपटू तुफान ट्रोल होत आहे. खुद्द शोएब याने तिसऱ्या पत्नीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत ज्यामुळे शोएब याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे… नेटकरी फोटो कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब आणि त्याच्या खासगी आयुष्याची याची चर्चा रंगली आहे.