सानिया मिर्झा हिच्यासोबत घटस्फोट, शोएब मलिक अखेर व्यक्त झालाच; म्हणाला, ‘काहीही फरक पडत नाही कारण…’

shoaib malik and sana javed: सानिया मिर्झा आणि पाच वर्षाच्या मुलाची साथ सोडल्यानंतर शोएब मलिक याने अखेर मौन सोडलंच... म्हणाला, 'काहीही फरक पडत नाही कारण...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया आणि शोएब यांच्या नात्याची चर्चा...

सानिया मिर्झा हिच्यासोबत घटस्फोट, शोएब मलिक अखेर व्यक्त झालाच; म्हणाला, 'काहीही फरक पडत नाही कारण...'
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 10:29 AM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्याचा अंत झाला आहे. सानिया मिर्झा आणि पाच वर्षांच्या मुलाला सोडून शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत संसार थाटला आहे. सना हिच्यासोबत तिसरं लग्न केल्यामुळे शोएब याला ट्रोल देखील करण्यात आलं. लग्नानंतर खुद्द शोएब याने सना हिच्यासोबत फोटो पोस्ट केले. भारतात आणि पाकिस्तानमध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सना जावेद आणि शोएब मलिक गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. शिवाय पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून सानिया हिला शोएब याला घटस्फोट दिल्याची देखील माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, सना जावेद विवाहित असूनही शोएब मलिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

शोएब याच्यासोबत सना हिचं दुसरं लग्न आहे. सना हिचं पहिलं लग्न उमैर जसवाल याच्यासोबत झालं होतं. सना पहिला पती उमेर जसवाल याची फसवणूक करत होती. पाकिस्तानी मीडिया सना जावेदबाबत सातत्याने अनेक दावे करत आहे. आता तिसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदा शोएब याने प्रतिक्रिया दिली आहे.

शोएब मलिक मला काहीही फरक पडत नाही… असं म्हणत, म्हणाला, ‘मला असं वाटतं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करायला हवं. तुमच्याबद्दल लोकं काय विचार करतील हा विचार तुम्ही करायला नको… मग ही गोष्ट समजण्यासाठी अनेक वर्ष गेली तरी काही हरकत नाही…. आयुष्यात कायम पुढे जा आणि काम करा.’ सध्या सर्वत्र शोएब याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

2010 मध्ये शोएब मलिकने भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं त्यानंतर सानिया शोएब यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सानिया हिने 2014 मध्ये मुलाला जन्म दिला. पण सानिया आणि शोएब यांचं नातं फार काळ टिकलं नाही. सध्या सर्वत्र दोघांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.