सानिया मिर्झा हिची घटस्फोटानंतर पहिली इन्स्टाग्राम पोस्ट, एक शब्दात सांगितलं फार काही

Sania Mirza : घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिची पहिली इन्स्टाग्राम पोस्ट, एका शब्दात असं काय म्हणाली, ज्यावर नेटकरी म्हणाले, 'शोएब मलिक हेट बटन...', सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

सानिया मिर्झा हिची घटस्फोटानंतर पहिली इन्स्टाग्राम पोस्ट, एक शब्दात सांगितलं फार काही
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 8:04 AM

मुंबई | 27 जानेवारी 2024 : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सानिया हिने अनेक नवे रेकॉर्ड रचत भारतीयांच्या मनात घर केलं. सानिया हिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं. पण सानिया हिने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. सानिया हिचा पहिला पती आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

घटस्फोटानंतर सानिया हिने शोएब याला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्याचं देखील समोर आलं. आता घटस्फोटानंतर पहिल्यांदा सानिया हिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. काळ्या रंगातील फोटो पोस्ट करत सानिया हिने कॅप्शनमध्ये ‘रिफ्लेक्शन..’ असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सोशल मीडियावर सानिया हिने एका शब्दात खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सानिया हिच्या पोस्टवर अनेक नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. तर अनेकांनी शोएब याला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘शोएब मलिक हेट बटन…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सानिया आम्ही तुझ्यासोबत आहोत..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सानियासाठी रिस्पेक्ट बटन…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, शोएब मलिक याच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून सानिया हिने स्वतःने पतीला घटस्फोट दिला. आता सानिया तिच्या मुलासोबत जगत आहे. सानिया आणि तिचा मुलगा दुबई येथे राहतात. घटस्फोटानंतर सानिया पुन्हा भारतात येणार का? अशा चर्चा देखील जोर धरत आहेत.

सानिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सानिया हिने कायम स्वतःचं खासगी आयुष्य गुपित ठेवलं. पण सोशल मीडियावर सानिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सानिया कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सानिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सानिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.