Sania Mirza : अखेर झालं तरी काय सानिया मिर्झा पोहोचली रुग्णालयात? फोटो पोस्ट करत म्हणाली…

Sania Mirza in Hospital : सानिया मिर्झा हिचा रुग्णालयातील पहिला फोटो समोर, सानिया हिला अखेर झालंय तरी काय? म्हणाली..., सानिया हिचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया मिर्झा हिची चर्चा

Sania Mirza : अखेर झालं  तरी काय सानिया मिर्झा पोहोचली रुग्णालयात? फोटो पोस्ट करत म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 3:16 PM

मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्तेत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सानिया सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील सानिया हिने स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिची चर्चा रंगली आहे.

सानिया हिने रुग्णालयातील एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत सानिया हिने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सानिया डॉक्टरांना म्हणाली, ‘माझ्या त्वेचेच्या अडचणी दूर कऱण्याऱ्या डॉक्टरांचे आभार…’, सानिया मिर्झा हिच्या डॉक्टरांचं नाव Radmila Lukian असं आहे.

सानिया हिची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहेत. सानिया हिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सानिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या सानिया तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक

सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. सानिया आणि शोएब लग्नाच्या 14 वर्षांनंतर विभक्त झाले आहेत. सानिया आणि शोएब यांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. सानिया कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सानिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सानिया मिर्झाचा आता घटस्फोट झाला आहे. सानिया मिर्झाने शोएबला खुला दिला आहे. त्यानंतर शोएब मलिकने तिसरा विवाह केला आहे. सना जावेद सोबत विवाह केल्यानंतर शोएबवर पाकिस्तानातूनच टीका केली जात आहे. एवढंच नाही तर, पकिस्तानी नागरिक सना जावेद हिला देखील ट्रोल करत आहेत.

सना हिच्यासोबत तिसरं लग्न केल्यानंतर खुद्द शोएब याने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फोटो समोर आल्यानंतर काहींनी दोघांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर काहींनी मात्र शोएब याला ट्रोल केलं. शोएब याच्या तिसऱ्या लग्नात कुटुंबिय देखील उपस्थित नसल्याची माहिती समोर आली.

धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.