Sania Mirza हिला शोएब मलिक सोबत लग्न केल्याचा होतोय पश्चाताप? ‘या’ अभिनेत्यासोबत करायचं होतं लग्न

Sania Mirza : सानिया मिर्झा हिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, शोएब मलिक नाही तर, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत थाटायचा होता अभिनेत्रीला संसार? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

Sania Mirza हिला शोएब मलिक सोबत लग्न केल्याचा होतोय पश्चाताप? 'या' अभिनेत्यासोबत करायचं होतं लग्न
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 3:54 PM

मुंबई | 18 जानेवारी 2024 : सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सध्या टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सानिया हिने सोशल मीडियावरुन पती शोएब मलिक याच्यासोबत असलेले फोटो देखील डिलिट केले आहेत. म्हणून सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, सानिया हिला एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करायचं होतं… एका शोमध्ये खुद्द सानिया हिने तिच्या मनातील इच्छा व्यक्त केली होती. सध्या सर्वत्र सानिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सानिया हिला बोलावण्यात आलं होतं. शोमध्ये सानिया हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये करण हिने सानिया हिला अनेक प्रश्न विचारली. सानिया हिने देखील करण याच्या प्रत्येक प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दिलं.

करण याने सानिया हिला विचारलं, ‘सानिया तुला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर, तुला कोणत्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करायला आवडेल?’ यावर सानिया म्हणाली, सलमान खान याच्यासोबत काम करायला आवडेल. पुढे करण याने ‘तुला कोणाला डेट करायला आवडेल…’ यावर सानिया हिने अभिनेता रणबीर कपूर याचं नाव घेतलं…

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर, ‘तुला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न करायला आवडेल?’ यावर सानिया म्हणाली, ‘मला रणबीर कपूर याच्यासोबत लग्न करायला आवडेल. कारण रणबीरवर माझं क्रश आहे…’, अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत सानिया हिने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सानिया आणि शोएब

सानिया आणि शोएब यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सानिया आणि शोएब यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण गेल्या वर्षापासून सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्यावर वर्षी शोएब याच्या नावाची चर्चा पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमर हिच्यासोबत तुफान रंगली होती.

आत्तापर्यंत सानिया किंवा शोएब यांच्यापैकी कोणीच या मुद्यावर काहीही भाष्य केलेलं नाही. एवढंच नाही तर, दोघांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. रिपोर्टनुसार, आयेशा उमर हिचं आता लग्न झालं आहे. सानिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर सानिया कायम लेकासोबत फोटो पोस्ट करत असते.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.