sanjay Dutt | अफेअरच्या चर्चा रंगत असताना संजूबाबाने मागितली माधुरीची माफी; कारण जाणून व्हाल थक्क

माधुरी दीक्षित हिच्यासाठी पहिल्या पत्नीला सोडयला तयार होता संजूबाबा? रुबाबात जगणाऱ्या संजय दत्त याने असं काय केलं, ज्यामुळे माधुरीची मागावी लागली माफी?

sanjay Dutt | अफेअरच्या चर्चा रंगत असताना संजूबाबाने मागितली माधुरीची माफी; कारण जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 11:01 PM

मुंबई | 29 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी ज्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा आजही रंगलेली असते. एक काळ असा होता, जेव्हा अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधूरी दीक्षित यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघे एकमेकांना डेट करत आहेत आशा देखील अनेक चर्चा रंगल्या. पण दोघांनी कधीही सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नव्हता. म्हणून आजही संजय – माधुरी यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत असतात. दोघांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या, ज्यामुळे संजूबाबाने सर्वांसमोर माधुरीची माफी देखील मागितली होती.

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी ‘साजन’, ‘खलनायक’, ‘थानेदार’, ‘कानून अपना अपना’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. चाहत्यांनी देखील माधुरी – संजय यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. फक्त ऑनस्क्रिन नाही तर, खऱ्या आयुष्यात देखील दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.

संजूबाबाने अनेक सिनेमांमध्ये माधुरी हिच्यासोबत काम केलं, पण ‘साजन’ सिनेमानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी वेग धरला. तेव्हा दोघांनी देखील रंगणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं नाही. जेव्हा माधुरी – संजय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या तेव्हा, संजूाबाबा विवाहित होता.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, 1993 मध्ये एका मुलाखतीत संजयने माधुरीसोबतच्या असलेल्या नात्यावर नकार दिला होता. अभिनेता म्हणाला की, त्याच्या आणि माधुरीमध्ये असं काहीही सुरू नाहीये. ‘साजन’च्या शूटिंगदरम्यान संजय दत्तने माधुरी दीक्षितकडे जाऊन अफेअरच्या या चर्चांबद्दल तिची माफी मागितली होती.

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना संजय दत्त अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला. मुंबई बॉम्बस्फोटात नाव समोर आल्यानंतर संजय दत्तला तुरुंगात जावं लागलं. संजय तुरुंगात गेल्यानंतर माधुरीने संजूबाबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.

अफेअरच्या चर्चा रंगल्यानंतर दोघे कधीही एकत्र आले नाहीत. पण अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दोघे आमने – सामने आले. पण जवळपास २६ वर्षांनंतर माधुरी – संजय यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमात अभिनेता वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही… फिल्मी कुटुंबातील नसून देखील माधुरी दीक्षित हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. आज अभिनेत्रीची ओळख बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे. माधुरी फक्त अभिनेत्रीनसून एक उत्तम कथक नृत्यांगना देखील आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.