माधुरी दीक्षितमुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार उद्ध्वस्त? बायकोचं निधन आणि…

Madhuri Dixit Love Life: माधुरी दीक्षितमुळे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार झाला उद्ध्वस्त, विवाहित आणि एका मुलीच्या बापाच्या प्रेमात होती 'धकधक गर्ल...', अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर मात्र...

माधुरी दीक्षितमुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार उद्ध्वस्त? बायकोचं निधन आणि...
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 4:15 PM

अभिनेत्री माधुरी दीक्षित आता तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा माधुरी हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगली होती. माधुरीमुळे एका प्रसिद्ध अभिनेत्याचा संसार देखील उद्ध्वस्त झाला… असं अनेकदा सांगाण्यात आलं. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता संजय दत्त आहे. संजय दत्त याचं पहिलं लग्न माधुरी हिच्यामुळे मोडलं असे देखील अनेकदा समोर आलं. संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं.

बॉलिवूडमध्ये काम करत असताना रिचा हिने अभिनेता संजय दत्त याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर रिचा हिने बॉलिवूडचा निरोप घेतला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. फार कमी वयाच रिचा हिने अनेक संकटांना तोंड दिलं आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंच रिचा हिने संटकांचा सामना केला. फार कमी लोकांना रिचा शर्मा हिच्याबद्दल माहिती आहे.

लग्नाआधी संजय दत्त याने घातलेली अट

बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना रिचा शर्मा आणि संजय दत्त यांची पहिली ओळख झाली. पहिला भेटीतच रिचा आणि संजय एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा आणि संजय यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण संजयने एकाच अटीवर लग्न करेल असं रिचाला सांगितलं. लग्नानंतर सिनेमात काम करायचं नाही… असं अभिनेत्याची अट होती. अभिनेत्याची अट रिचाने मान्य देखील केली.

रिचा हिने अट मान्य केल्यानंतर 1987 मध्ये न्यूयॉर्क याठिकाणी दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या एका वर्षानंतर रिचा हिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनंतर रिचा हिला ब्रेन ट्यूमर असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे रिचा हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता. संजय सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे अभिनेत्याला पत्नीला वेळ देता येत नव्हता…

संजय दत्त – माधुरी यांचं अफेअर

याच दरम्यान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. जेव्हा दोघांच्या रिलेशनशिपबद्दल रिचाला कळंल तेव्हा तिला मोठा धक्का बसला. आजारी असताना देखील रिचा संसार टिकवण्यासाठी मुंबईत आली. पण संजय आणि रिचा यांच्यामधील अडचणी वाढत होत्या. अखेर नातं घटस्फोटापर्यंत आलं. रिचा हिची प्रकृती चिंताजनक होऊ लागली आणि ती पून्हा न्यूयॉर्क याठिकाणी गेली.

पत्नी न्यूयॉर्क येथे गेल्यानंतर संजय दत्तच्या अडचणीत वाढ होऊ लागली. बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला तुरुंगवास भोगावा लागला. अखेर 10 डिसेंबर 1996 रोजी रिचा शर्मा हिचं निधन झालं. रिचा गेल्यानंतर तिच्या मुलीचे संगोपन अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी केलं. तर संजूबाबा आता तिसऱ्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.