Sanjay Dutt | तुरुंगातही ‘या’ राजघराण्याच्या लेकीने सोडली नाही संजूबाबा साथ; तुरुंगातून सुटल्यावर मात्र…

Sanjay Dutt | याला प्रेम म्हणतात? तुरुंगात असताना 'या' राजघराण्याच्या लेकीने कायम दिली संसूबाबाची साथ... लग्नपण केलं पण नाही टिकलं नातं, तिने का सोडलं अभिनेत्याला.. सध्या सर्वत्र संजूबाबा आणि त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा..

Sanjay Dutt | तुरुंगातही 'या' राजघराण्याच्या लेकीने सोडली नाही संजूबाबा साथ; तुरुंगातून सुटल्यावर मात्र...
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 9:08 PM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेता कायम वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत राहिला. आज संजूबाबा तिसरी पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळा असा होता, जेव्हा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. संजय दत्त याची पहिली पत्नी रिचा शर्मा हिच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. संजूबाबाच्या पहिल्या पत्नीचं कर्करोगामुळे निधन झालं. पण अभिनेत्याची दुसरी पत्नी रिया पिल्लाई (rhea pillai) यांच्या नात्याबद्दल देखील फार चर्चा रंगल्या.

ड्रग्ज प्रकरण, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोपांमुळे संजय दत्त तुरुंगात शिक्षा भोगत होता. तेव्हा अनेकांनी अभिनेत्याची साथ सोडली. पण रिया पिल्लाई ही कायम अभिनेत्यासोबत उभी राहिली. तिने कधीही संजूबाबा याची साथ सोडली नाही. रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे.

आयुष्यातील वाईट दिवस आणि अनेकांनी साथ सोडून देखील अभिनेत्याच्या कठीण काळात रिया सोबत होती. कठीण काळात साथ दिल्यामुळे संजय याच्या मनात रिया हिच्याबद्दल प्रेम आणि सन्मान अधिक वाढला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

लग्नानंतर अभिनेत्याने सात सिनेमे साइन केले होते. त्यामुळे संजूबाबाकडे रियासाठी वेळ नव्हता. संजूबाबा त्याच्या कामांमध्ये व्यस्त झाला आणि रिया प्रेम असूनही एकटी पडली. म्हणून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या. पण रिपोर्टनुसार तेव्हा संजय आणि मान्यता यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या, तर दुसरीकडे रियाने टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करायला सुरुवात केली.

अखेर संजय आणि रिया यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यासिर उस्मानने त्यांच्या ‘द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड बॉय संजय दत्त’ पुस्तकातही या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे.

पुस्तकात लिहिलं आहे की, ‘बॉलीवूडमधील प्रत्येकाला वाटत होते की संजय दत्तची फसवणूक झाली आहे, परंतु संजय दत्तने घटस्फोटाच्या बदल्यात रिया पिल्लईला वांद्रे येथे दोन फ्लॅट्सही दिले शिवाय, देजा वु एंटरटेनमेंट आणि ग्लोबल एंटरटेनमेंट या दोन कंपन्यांचे शेअर्सही रियाच्या नावावर होते. आता संजूबाबा पत्नी मान्यता आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

रिया आणि लिएंडर पेस यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. दोघे लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहत होते. लिएंडर पेस आणि रिया यांना एक मुलगी देखील आहे. पण दोघांचं नातं देखील अधिक काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.. रिया देखील कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.