संजय दत्तची एक वाईट सवय, अभिनेत्याला सोडून गेली राजघराण्याची लेक, नातं तुटल्यानंतर संजूबाबने दिली मोठी रक्कम
Sanjay Dutt : राजघराण्याच्या मुलीची संजय दत्त यांच्या आयुष्यात एन्ट्री, तुरुंगात बहरली 'लव्हस्टोरी', पण संजूबाबाच्या एक सवयीमुळे तुटलं नातं... 'ती' आता असं जगतेय आयुष्य... संजय दत्त याचं खासगी आयुष्य चर्चेत
मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. संजूबाबाचे दहा वीस नाही तर, तब्बल 308 महिलांसोबत अफेअर होते… असा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला संजय दत्त आता पत्नी मान्यता दत्त आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. मान्यता संजय दत्त याची तिसरी पत्नी आहे. अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं कर्करोगामुळे निधन झालं. संजूबाबा याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
संजय दत्त याची पहिली पत्नी रिचा शर्मा हिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्याची दुसरी पत्नी रिया पिल्लाई (rhea pillai) यांच्या नात्याबद्दल देखील फार चर्चा रंगल्या. त्यानंतर संजय आणि रिया यांनी १४ फेब्रुवारी रोजी लग्न केलं. अभिनेता जेलमध्ये असताना रिया हिने संजूबाबाची साथ सोडली नाही.
ड्रग्ज प्रकरण, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोपामुळे अभिनेत्याला अटक करण्यात आली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर संजयच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लई हिची एन्ट्री झाली. संजूबाबा तुरुंगात असताना रिया हिने कधीच संजय दत्त याची साथ सोडली नाही. त्यामुळे दोघांचं नातं अधिक घट्ट झालं.
रिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रिया हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि 1998 मध्ये लग्न केलं.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्याने रिया हिच्यासोबत लग्न केलं. पण संजय दत्त याच्याकडे रियासाठी वेळच नव्हता. सिनेमाच्या शुटिंगमध्ये अभिनेता व्यस्त होता. म्हणून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या. पण रिपोर्टनुसार तेव्हा संजय आणि मान्यता यांच्या नात्याच्या चर्चा रंगू लागल्या, तर दुसरीकडे रियाने टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करायला सुरुवात केली. आशात रिया आणि संजय यांचा घटस्फोट झाला.. लिएंडर पेस याच्यासोबत देखील रिया हिचं नातं टिकलं नाही.
दरम्यान, यासिर उस्मानने त्यांच्या ‘द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड बॉय संजय दत्त’ पुस्तकातही या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात लिहिलं आहे की, ‘बॉलीवूडमधील प्रत्येकाला वाटत होते की संजय दत्तची फसवणूक झाली आहे, परंतु संजय दत्तने घटस्फोटाच्या बदल्यात रिया पिल्लईला वांद्रे येथे दोन फ्लॅट्सही दिले शिवाय, देजा वु एंटरटेनमेंट आणि ग्लोबल एंटरटेनमेंट या दोन कंपन्यांचे शेअर्सही रियाच्या नावावर होते. आता संजूबाबा पत्नी मान्यता आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.