Sanjay Datta | कुठे आहे संजूबाबाची दुसरी पत्नी? घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात खेळाडूची एन्ट्री पण एक्झिट वाईट

हैदराबाद येथील महाराजांची नात आहे सूंजूबाबाची दुसरी पत्नी, घटस्फोटानंतर रिया पिल्लई हिच्या आयुष्यात प्रसिद्ध खेळाडूची एन्ट्री, पण दोघांच्या नात्याचा अतं अत्यंत वाईट... 'ती' आता करते तरी काय?

Sanjay Datta | कुठे आहे संजूबाबाची दुसरी पत्नी? घटस्फोटानंतर तिच्या आयुष्यात खेळाडूची एन्ट्री पण एक्झिट वाईट
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 1:49 PM

मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : अभिनेता संजय दत्त त्याच्या सिनेमांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. संजूबाबा याचं एक दोन नाही तर, चक्क ३०८ महिलांसोबत संबंध होते. संजूबाबा याच्या गर्लफ्रेंड्स पासून ते अभिनेत्याच्या तीन पत्नींबद्दल देखील तुफान चर्चा रंगलेल्या असतात. संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचं निधन कर्करोगामुळे झालं होतं. तर अभिनेत्याची दुसरी पत्नी म्हणजे रिया पिल्लाई… रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. कठीण काळात एकमेकांची साथ दिल्यामुळे संजय याच्या मनात रिया हिच्याबद्दल प्रेम आणि सन्मान अधिक वाढला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि १९९८ मध्ये लग्न केलं. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. अखेर संजय आणि रिया यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा रिया हिच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली होती. प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत रिया रिलेशनशिपमध्ये होती.

घटस्फोटानंतर रिया आणि संजय यांच्या दोघांचे मार्ग वेगळे झाले. रिया हिने प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत संसार थाटला. तर दुसरीकडे संजय आणि मान्यता दत्ता हिच्यासोबत लग्न केलं. आज अभिनेता पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण रिया हिच्या आयुष्यात मात्र दुःखाचा डोंगर कोसळला.

हे सुद्धा वाचा

रिया हिने प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत संसार तर थाटला, पण दोघांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. पण दोघांचं लग्न देखील अधिक काळ टिकू शकलं नाही. त्यांना एक मुलगी देखील आहे. आता श्रीमंत घराण्याची लेक आणि संजूबाबाची दुसरी पत्नी काय करते याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिया पिल्लई हिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. रिया पिल्लई आता तिच्या मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिया पिल्लई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

दरम्यान, रिया हिच्याशिवाय टेनिसपटू लिएंडर पेस यांचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. अभिनेत्री महिमा चौधरी हिला देखील टेनिसपटू लिएंडर पेस यांनी डेट केलं आहे. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर महिमा चौधरी हिने लिएंडर पेस यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

लिएंडर पेस यांचं नाव अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत जोडलं जावू लागलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक रोमाँटिक फोटो देखील आहेत. पण आता किम शर्मा आणि लिएंडर पेस यांचं देखील ब्रेकअप झालं आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.