बाबा बागेश्वर यांच्या शरणी संजय दत्त; हात जोडून घेतला आशीर्वाद, म्हणाला “मी पुन्हा..”

अभिनेता संजय दत्त बाबा बागेश्वर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी शनिवारी बागेश्वर धाम पोहोचला. याठिकाणी त्याने बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर बागेश्वर बाबांची भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बाबा बागेश्वर यांच्या शरणी संजय दत्त; हात जोडून घेतला आशीर्वाद, म्हणाला मी पुन्हा..
Sanjay DuttImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 10:32 AM

अभिनेता संजय दत्त शनिवारी 15 जून रोजी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये त्याच्या टीमसोबत पोहोचला होता. याठिकाणी त्याने बागेश्वर धाम बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं. संजूबाबा शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास मुंबईहून निघाला. तर सहा वाजताच्या सुमारास तो खजुराहो एअरपोर्टवर पोहोचला. याठिकाणी धाम कुटुंबाकडून त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर गाडीने संजय दत्त बागेश्वर धामला पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर त्याने सर्वांत आधी भगवान बालाजींचं दर्शन घेतलं आणि परिक्रमा करून डोकं टेकवलं. यानंतर त्याने धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. या दोघांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

“बागेश्वर धाम हे देश आणि जगभरातील लोकांसाठी आस्थेचं मोठं केंद्र आहे. इथे भक्तांची आस्था पाहून मी थक्क झालोय. महाराजजींना भेटून मला वाटलं की जणू मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यासोबत मी जो वेळ घालवला, तो माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगल्या क्षणांपैकी एक आहे. मी पुन्हा पुन्हा बागेश्वर धाम जाईन. हे अद्भुत स्थान आहे. बालाजी सरकारची कृपा या स्थानावर सदैव राहू दे”, अशा शब्दांत संजयने भावना व्यक्त केल्या.

संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षातील हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. संजय दत्तच्या ‘घुडचढी’ या चित्रपटाची घोषणासुद्धा बऱ्याच काळापूर्वी झाली होती. यामध्ये त्याच्यासोबत रवीना टंडन मुख्य भूमिका साकारणार आहे. याशिवाय संजूबाबाच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘मास्टर ब्लास्टर’चाही समावेश आहे. यामध्ये त्याच्यासोबत टायगर श्रॉफ झळकणार आहे.

मध्यप्रदेशमधील छतरपूर याठिकाणी असलेलं तीर्थक्षेत्र हे बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखलं जातं. इथे बालाजींची पूजा केली जाते. बागेश्वर धाम महाराजांच्या दर्शनासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भक्त याठिकाणी येतात. धीरेंद्र शास्त्री इथले पीठाधीश्वर आहेत. धीरेंद्र शास्त्री हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....